जर तुमच्याकडे कार असेल आणि तुम्ही नेहमी कारच्या जुन्या टायरमुळे चिंतेत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी चांगली आहे. द्रुतगती मार्गावरील नेहमीच्या अपघातांमध्ये टायर फुटणे हे एक प्रमुख कारण आहे. पण आपल्या गाड्यांचे टायर फुटण्याची काही कारणे असू शकतात. टायरफुटीला मुख्य चार कारणे असतात. एक म्हणजे मर्यादेबाहेरील वेग, दुसरे म्हणजे एखाद्या टायरमधील हवेचा कमी दाब, तिसरे म्हणजे गाडीवरील अतिरिक्त बोजा आणि चौथं म्हणजे टायरची झालेली झीज. सध्या, कार मालकांना नेहमीच एक प्रश्न पडतो की त्यांनी टायर जुने झाल्यावर कधी बदलावे. कारण जुने टायर सुरक्षिततेसाठी धोकादायक ठरू शकतात. आता टायरची झीज झाल्याने जुना झाली की नाही हे लगेच कळणार आहे. कारण CEAT ने कलर-ट्रेड वेअर इंडिकेटरसह नवीन टायर्स लाँच केले आहेत. यामुळे वाहन मालकांना टायर्स जुने झाल्यावर ते कधी बदलायचे हे कळेल. CEAT दावा करते की कलर-ट्रेड वेअर इंडिकेटरसह तुम्ही या समस्येपासून पूर्णपणे मुक्त व्हाल.

CEAT टायर्सचे मुख्य विपणन अधिकारी अंकुर कुमार यांनी न्यूज १८ शी बोलताना सांगितलं की, “रस्त्यांवर जीर्ण झालेले टायर वापरणे त्यांच्यासाठी आणि इतर सर्वांसाठी असुरक्षित ठरू शकतात. आमच्या ग्राहकांना सुरक्षिततेसाठी टायर बदलण्याच्या वेळेबद्दल जागरूक करण्यासाठी आम्ही कलर ट्रेड वेअर इंडिकेटर तंत्रज्ञानासह एक नाविन्यपूर्ण उत्पादन घेऊन आलो आहोत.”

Saving
बचत फक्त मोठ्यांनी नाही, लहानांनीही करावी! मुलांना अर्थसाक्षर बनवण्यासाठी ‘या’ गोष्टी ठरतील फायदेशीर
RBI Monetary Policy Meeting 2024 Repo Rate Unchanged Marathi News
RBI MPC Meet : रेपो दरात कोणताही बदल नाही; रिझर्व्ह बँकेचा मोठा निर्णय, कर्जदारांना दिलासा!
Food blogger Natasha Diddee's death
फूड ब्लॉगर नताशा डिड्डींना होता डंपिंग सिंड्रोम; काय असतो ‘हा’ आजार
Garbage picker to video journalist Maya Khodve Journey
कचरा वेचक ते व्हिडिओ जर्नलिस्ट! माया खोडवे यांच्या जिद्दीचा प्रवास

ऑटो पायलट मोडमध्ये अपघात झाल्यास कंपनी घेणार कायदेशीर जबाबदारी, मर्सिडीजने केलं जाहीर

टायर कधी बदलायचे, जाणून घ्या
नवीन CEAT टायर्स ट्रेडच्या आत एम्बेड केलेल्या पिवळ्या पट्ट्यासह येतात. टायर नवे असताना ही पट्टी दिसत नाही, पण टायर जुने झाल्यावर किंवा जीर्ण झाल्यावर ही पट्टी दिसू लागते. जुने टायर बदलून नवीन टायर्स लावण्याची हीच योग्य वेळ असल्याचे हे द्योतक आहे. हे टायर १५-इंच आणि १६-इंच अशा दोन आकारात उपलब्ध केले जातील.