टाटा मोटर्स अल्ट्रोझ हॅचबॅक कार लॉन्च केल्यानंतर दोन वर्षांनी ऑटोमॅटिक व्हेरियंट आणण्याच्या तयारीत आहे. कंपनीने नुकताच ऑटोमॅटिक Tata Altroz ​​चा टीझर रिलीज केला आहे. ज्यामध्ये ही हॅचबॅक कार अतिशय प्रीमियम फीचर्सने सुसज्ज असल्याचं दिसत आहे. टाटा अल्ट्रोझ ऑटोमॅटिक कार मारुती बलेनो, हु्यंदाई i20, होंडा Jazz सारख्या इतर हॅचबॅक कारशी स्पर्धा करेल. टाटा मोटर्सने जानेवारी २०२० मध्ये अल्ट्रोध ​​कार पेट्रोल आणि डिझेल इंजिन पर्यायांमध्ये लाँच केली होती. टाटा ने जानेवारी २०२१ मध्ये अल्ट्रोझ​​चे टर्बो पेट्रोल इंजिन लाँच केले. अशा परिस्थितीत, टाटा मोटर्सकडे या प्रीमियम हॅचबॅक कारच्या प्रकारांमध्ये स्वयंचलित ट्रांसमिशनची कमतरता होती. टाटा मोटर्स लवकरच ऑटोमॅटिक व्हेरिएंट लाँच करून ही उणीव भरून काढणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

टाटा मोटर्स ऑटोमॅटिक ट्रान्समिशनसह अल्ट्रोझमध्ये नैसर्गिक स्प्रिंट पेट्रोल इंजिन किंवा टर्बो पेट्रोल इंजिन देऊ शकते. या हॅचबॅक कारला नेक्सन पेट्रोल एसयूव्हीचे ऑटोमॅटिक गिअरबॉक्स किंवा ड्युअल क्लिच ट्रान्समिशन मिळू शकते. कंपनी टाटा अल्ट्रोझ​​च्या ऑटोमॅटिक व्हेरियंटमध्ये इतर कोणतेही बदल करणार नाही. टाटा अल्ट्रोझ हॅचबॅक कार सध्या तीन इंजिन पर्यायांमध्ये उपलब्ध आहे. ज्यामध्ये पहिले १.२ लीटर नॅचरल स्प्रिंट पेट्रोल इंजिन आहे जे ८६ एचपी पॉवर जनरेट करते. दुसरा म्हणजे १.२ लीटर टर्बो पेट्रोल इंजिन जे ११० एचपी पॉवर जनरेट करते. तिसऱ्या पर्याय म्हणजे या हॅचबॅक कारमध्ये १.५ लीटर डिझेल इंजिन असून ८८ एचपी पॉवर जनरेट करते. ५ स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशन सध्या तीनही इंजिन पर्यायांसह उपलब्ध आहे.

Burning Cargo: Porsche, Audi सह चार हजार लग्झरी कारना जलसमाधी

टाटा अल्ट्रोझ​​ला सेफ्टी रेटिंगमध्ये ५ स्टार मिळाले आहेत. ही कार प्रौढ सुरक्षा आणि मुलांच्या सुरक्षेच्या बाबतीत इतर हॅचबॅक कारपेक्षा जास्त सुरक्षित आहे. किंमतीबद्दल बोलायचे झाल्यास टाटा अल्ट्रोझ​​च्या बेस व्हेरियंटची एक्स-शोरूम किंमत ५ लाख ९९ हजार रुपये आहे आणि टॉप व्हेरिएंटची एक्स-शोरूम किंमत ९ लाख ६६ हजार रुपये आहे. अशा परिस्थितीत टाटा अल्ट्रोझ​​च्या ऑटोमॅटिक व्हेरियंटची किंमतही जवळपास सारखीच असू शकते.

मराठीतील सर्व ऑटो बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Tata altroz automatic hachback car launch soon rmt