मंगळवारच्या ट्रेडिंग सत्रात भारतीय शेअर बाजार लाल रंगात बंद झाला. बाजारातील सर्व निर्देशांकांमध्ये घसरण नोंदवण्यात आली. सेन्सेक्स ८०१ अंकांनी म्हणजेच १.११ टक्क्यांनी घसरून ७१,१३९ अंकांवर आणि निफ्टी २१५ अंकांनी म्हणजेच ०.९९ टक्क्यांनी घसरून २१,५२२ अंकांवर बंद झाला. बँक निफ्टी आजच्या व्यवहारात अधिक संयमी दिसला आणि ७४ अंकांनी म्हणजेच ०.१६ टक्क्यांनी घसरून ४५,३६७ अंकांवर बंद झाला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

NSE वर आज शेअर्सचे वाढण्याचे आणि घसरण्याचे प्रमाण जवळपास समान होते. PSU बँक, धातू, रियल्टी आणि मीडिया या क्षेत्रांमध्ये वाढ दिसून आली आहे. ऑटो, आयटी, फार्मा, एफएमसीजी, फिन सर्व्हिस, एनर्जी, इन्फ्रा आणि सेवा क्षेत्राचे निर्देशांक लाल रंगात बंद झाले. आजच्या व्यवहारात लार्ज आणि मिड कॅप समभागांमध्ये विक्री दिसून आली. त्याचबरोबर स्मॉलकॅप शेअर्समध्ये खरेदी दिसून आली. निफ्टी स्मॉलकॅप १०० निर्देशांक ३५ अंकांनी म्हणजेच ०.२० टक्क्यांनी वाढून १५,६७३ अंकांवर बंद झाला.

हेही वाचाः Interim Budget 2024 : तारीख, वेळ अन् अर्थसंकल्पातून केंद्रीय अर्थमंत्र्यांकडून काय अपेक्षा?

टाटा मोटर्स, एचयूएल, एसबीआय, टेक महिंद्रा आणि पॉवर ग्रिड वाढीसह बंद झाले. बजाज फायनान्स, टायटन, अल्ट्राटेक सिमेंट, NTPC, रिलायन्स, बजाज फिनसर्व्ह, ITC, L&T, सन फार्मा, M&M, HCL Tech, HDFC बँक, Asian Paints, Axis Bank, IndusInd Bank, भारती एअरटेल, इन्फोसिस, मारुती सुझुकी, टाटा स्टील, नेस्ले, आयसीआयसीआय बँक, जेएसडब्ल्यू स्टील, विप्रो, टीसीएस आणि कोटक महिंद्रा तोट्यासह बंद झाले.

हेही वाचाः पंतप्रधान मोदी महिलांना गिफ्ट देण्याच्या तयारीत? महिलांना कर रचनेतून दिलासा मिळण्याची शक्यता

जागतिक बाजारपेठेची स्थिती काय?

जागतिक बाजारात आज संमिश्र परिणाम दिसून आले. शांघाय, हाँगकाँग, तैपेई आणि सोलमध्ये घसरण झाली. जकार्ता आणि टोकियोचे बाजार बंद झाले. सोमवारी अमेरिकन बाजारात वाढ झाली आणि डाऊ सुमारे ०.५० टक्क्यांच्या वाढीसह बंद झाला. क्रूड ऑइल बेंचमार्क ब्रेंट क्रूड मर्यादित श्रेणीत काम करीत आहे. ते प्रति बॅरल सुमारे ८१ डॉलर आहे.

मराठीतील सर्व बाजार बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Markets closed with heavy losses sensex fell by 800 points nifty by 215 points vrd