आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

तंबाखू सेवनामुळे जगामध्ये दर वर्षी जवळपास ६० लक्ष लोकांचा मृत्यू होतो. सरकारच्या आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयातर्फे राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम सुरू करण्यात आला आहे.

उद्दिष्टे

  • तंबाखूमुळे आरोग्यावर होणार दुष्परिणाम आणि तंबाखू नियंत्रण कायदय़ाविषयी मोठय़ा प्रमाणावर जनजागृती करणे.
  • सिगारेट व अन्य तंबाखूजन्य उत्पादने कायदा २००३ याची प्रभावीपणे अंमलबजावणी.

उपक्रम

  • तंबाखूच्या दुष्परिणामाविषयी आणि तंबाखू नियंत्रण कायद्याविषयी संबंधित शासकीय / खासगी संस्थांच्या कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण
  • तंबाखूच्या दुष्परिणामाविषयी विविध पद्धतींचा अवलंब करून जनजागृती करणे
  • शालेय विद्यार्थी आणि शिक्षक यांना तंबाखूमुळे आरोग्यावर होणाऱ्या दुष्परिणामाविषयी प्रशिक्षण देणे
  • जिल्हा स्तरावर तंबाखू व्यसनमुक्तीकरिता समुपदेशन केंद्र चालविणे
  • तंबाखू नियंत्रण कायदय़ाच्या अंमलबजावणीबाबत तांत्रिक मदत करणे
  • सरकारी विभाग आणि बिनसरकारी संस्थांबरोबर कामे करून तंबाखू नियंत्रण करणे.

स्वयंसेवी संस्थांची भूमिका     

  • जिल्हास्तरावर राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमांतर्गत बिगर सरकारी संस्थांचा सहभाग घेऊ शकतात
  • आरोग्य कर्मचारी कायदा अंमलबजावणी, महिला बचत गट तसेच इतर संस्था यांना तंबाखू नियंत्रणबाबत प्रशिक्षण देऊ शकतात.
  • शालेय विदय़ार्थ्यांमध्ये तंबाखूविरोधी जनजागृती करण्यासाठी व तसेच जिल्हास्तरावर तंबाखूमुक्त शाळा ही संकल्पना राबवू शकतात.
मराठीतील सर्व लेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: National tobacco control program