RSMSSB Recruitment 2024: सरकारी नोकरी हवीये? मग आता नो टेन्शन. थेट सरकारी नोकरी करण्याची मोठी संधी ही तुमच्याकडे आहे. विशेष म्हणजे मेगा भरतीला सुरूवात झालीये. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांनी या भरती प्रक्रियेच्या तयारीला लागावे. इच्छुक उमेदवारांनी वेळ वाया न घालता या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावीत. नुकताच या भरती प्रक्रियेबद्दलची अधिसूचना ही प्रसिद्ध करण्यात आलीये. विशेष बाब म्हणजे विविध पदांसाठी ही भरती प्रक्रिया सुरू आहे. या भरती प्रक्रियेची सर्वात विशेष बाब म्हणजे ही भरती प्रक्रिया तब्बल ४१९७ पदांसाठी पार पडत आहे. खरोखरच ही मोठी सुवर्णसंधीच आहे. इच्छुक उमेदवारांनी अजिबातच वेळ वाया न घालता या भरती प्रक्रियेसाठी लवकरात लवकर अर्ज करावेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

राजस्थान स्टाफ सेलेक्शन बोर्डकडून ही भरती प्रक्रिया राबवली जात आहे. अर्जाची प्रक्रिया २० फेब्रुवारीपासून म्हणजेच आजपासून सुरू होईल आणि अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत २० मार्च २०२४ आहे. इच्छुक उमेदवार rsmssb.rajasthan.gov.in या अधिकृत वेबसाइटद्वारे ऑनलाइन अर्ज करू शकतात.

RSMSSB भरती 2024 पदे: ही भरती कनिष्ठ सहाय्यक आणि लिपिक पदांसाठी असेल. तब्बल ४१९७ पदांसाठी पार पडत आहे. त्यापैकी ५८४ ग्रेड १ लिपिकांसाठी, ६१ ग्रेड १ लिपिकांसाठी आणि ३५५२ कनिष्ठ सहाय्यकांसाठी आहेत.

RSMSSB भर्ती 2024 शैक्षणिक पात्रता: उमेदवारांनी मान्यताप्राप्त मंडळातून डिप्लोमाइन कॉम्प्युटर सायन्स तसेच कॉम्प्युटरसह वरिष्ठ माध्यमिक प्रमाणपत्र किंवा पॉलिटेक्निक संस्थेकडून कॉम्प्युटर सायन्स आणि इंजिनीअरिंगमध्ये डिप्लोमा केलेला असावा. अधिक माहितीसाठी संकेतस्थळाला भेट द्या. rsmssb.rajasthan.gov.in या संकेतस्थळावर जाऊन तुम्ही या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करू शकता.

RSMSSB भरती 2024 अधिसूचना: https://rsmssb.rajasthan.gov.in/Static/files/Adv_LDC_1_2024.pdf

RSMSSB भरती 2024 वयोमर्यादा: अर्जदारांचे वय १ जानेवारी २०२५ पर्यंत १८ ते ४० च्या दरम्यान असावे.

हेही वाचा >> Indian Railway Bharti 2024 : १० वी पास उमेदवारांना नोकरीची संधी, रेल्वेमध्ये ५,६९६ पदांसाठी मेगाभरती, जाणून घ्या शेवटची तारीख

RSMSSB भरती 2024 अर्ज शुल्क: सामान्य श्रेणी, BC (क्रिमी लेयर) आणि EBC (क्रिमी लेयर) मधील उमेदवारांनी ६०० रु. फी भरणे आवश्यक आहे. BC (नॉन-क्रिमी लेयर), EBC (नॉन-क्रिमी लेयर), EWS, SC, ST आणि PwD श्रेणीतील उमेदवारांना ₹४०० रु फी भरावी लागेल.

मराठीतील सर्व करिअर बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rsmssb recruitment 2024 apply for 4197 clerk junior assistant exam from feb 20 srk