Success Story: अनेकदा उच्च शिक्षण घेऊन, मोठ्या पगाराच्या नोकरीची ऑफर येऊनही काही लोक स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय घेतात. बऱ्याचदा हा प्रयत्न फसतो. पण, काही जण समोरील आव्हाने स्वीकारून, पुढे जाताना येणाऱ्या अडीअडचणींवर यशस्वीपणे मात करतात. आयआयटी पदवीधर असलेल्या विद्यार्थ्यांचीदेखील अनेकदा मोठमोठ्या कंपन्यांकडून मोठ्या पगारावर नियुक्ती केली जाते. सध्या जगातील अनेक मोठ्या कंपन्यांचे प्रमुख आयआयटी पदवीधर आहेत. पण, काही लोक स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यास प्राधान्य देतात. आज आम्ही अशाच एका आयआयटी पदवीधराचा प्रेरणादायी प्रवास सांगणार आहोत; ज्याने तब्बल १७ वेळा अपयश मिळूनही हार मानली नव्हती.

आयआयटी कानपूरचा विद्यार्थी असलेल्या अंकुश सचदेवाचा प्रेरणादायी प्रवास लाखो लोकांसाठी आदर्श उदाहरण आहे. अंकुश सचदेवाने आयआयटी कानपूरमधून कॉम्प्युटर सायन्समध्ये बी.टेक. केले. आयआयटीमधून पदवी घेतल्यानंतर अंकुशने मायक्रोसॉफ्टसारख्या मोठ्या कंपनीत इंटर्न म्हणून करिअरला सुरुवात केली. पण, त्याला नोकरीत रस नसल्याने त्याने नोकरी सोडून स्वतःचा व्यवसाय सुरू केला. मात्र, त्याला यश मिळाले नाही. त्यानंतर खचून न जाता त्याने दुसरी कंपनी सुरू केली; मात्र तो प्रयत्नदेखील फसला. अशा प्रकारे एकानंतर एक अंकुशने तब्बल १७ वेळा स्टार्टअप सुरू करण्याचा प्रयत्न केला. पण, प्रत्येक वेळी तो अपयशी ठरला. तरीही हार न मानता, तो सातत्याने प्रयत्न करीत राहिला. शेवटी १८ व्या वेळी त्याला यश मिळाले.

More Stories onकरिअरCareer
मराठीतील सर्व करिअर बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Success story failed 17 times but tried without giving up today is the owner of a company worth 40000 crores sap