शिवेसना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर राज्याच्या नेतृत्वाची धुरा शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे सांभाळणार आहेत. एकनाथ शिंदे हे राज्याच्या नवे मुख्यमंत्री असतील, भाजपा पक्षाचा या सरकारला पाठिंबा असेल, अशी घोषणा भापजा नेते देवेंद्र फडणवीस यांनी घोषणा केली आहे. ही घोषणा करताना मी या सरकारचा भाग नसेन, मात्र या सरकारची माझ्यावर जबाबदारी असेन, असेही फडणवीस यांनी जाहीर केले होते. मात्र फडणवीसांच्या या घोषणेनंतर भाजपच्या दिल्लीमधील शीर्ष नेतृत्वाने वेगळी भूमिका मांडली आहे. देवेंद्र फडणवीस राज्याचे उपमुख्यमंत्री होतील, असे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी जाहीर केले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांच्यासोबत भाजपाचे नेते देवेंद्र फडणवीस हे उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. याआधी आज फक्त एकनाथ शिंदे हेच मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतील असं सांगण्यात आलं होतं. तसेच मी या सरकारमध्ये प्रत्यक्ष सहभागी नसेन, असे फडणवीस यांनी सांगितले होते. मात्र भाजपाचे केंद्रीय नेते अमित शाह आणि जेपी नड्डा यांनी फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री होऊन राज्यात सहभागी व्हावे अशी विनंती केली. या विनंतीनंतर फडणवीसांनी उपमुख्यमंत्रीपद स्वीकारण्यासा होकार दिला आहे. आज एकनाथ शिंदे यांच्यासोबतच फडणवीस यांचादेखील शपथविधी होईल.

एकनाथ शिंदे होणार राज्याचे नवे मुख्यमंत्री

एकनाथ शिंदे राज्याचे नवे मुख्यमंत्री होणार आहेत. त्यांच्या नावाची घोषणा देवेंद्र फडणवीस यांनी केल. “आज शिवसेनेचा विधीमंडळ गट शिंदे यांच्या नेृत्वाखाली आम्ही भाजप आणि १६ अपक्ष -छोटे आमदार हा सोबत आलेला आहे. आणखी काही सोबत येत आहे. भाजपाने हा निर्णय़ केली आहे, आम्ही सत्तेच्या मागे नाहीत, ही तत्वांची लढाई आहे, ही विचारांची लाढाई आहे. भाजपा शिंदे यांना समर्थन देईल आणि एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री होतील,” अशी माहिती फडणवीस यांनी याआधी दिली.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bjp national president jp nadda said devendra fadnvais should take charge as deputy cm of maharashtra prd