Gang Rape : १७ वर्षांच्या मुलीचं अपहरण करुन तिच्यावर सामूहिक बलात्कार करण्यात आला. यानंतर या नराधमांनी हा व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पीडितेच्या भावापर्यंतही पोहचला. त्यानंतर तो अस्वस्थ झाला या प्रकरणी त्याने पोलिसांत धाव घेतली. पीडिता तिच्या शेतात कापणीसाठी गेली होती. त्यावेळी तिला एकटं पाहून तिला पळवण्यात आलं आणि त्यानंतर तिच्यावर सामूहिक बलात्कार ( Gang Rape ) करण्यात आला. या घटनेबाबत कुणाकडे वाच्यता केलीस तर तुला ठार करु अशी धमकीही आरोपींनी तिला दिली होती. जिवाच्या भीतीने ती मुलगी गप्प राहिली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पोलिसांनी काय सांगितलं?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रविवारी संध्याकाळी चार वाजण्याच्या सुमारास १७ वर्षांची मुलगी शेतात पिक कापणीसाठी गेली होती. ती शेतात एकटीच आहे हे पाहून जसवंत पाल आणि नीरज अहिरवर या दोघांनी तिला शेतातून पळवलं आणि तिच्यावर सामूहिक बलात्कार ( Gang Rape ) केला. शेतातून पळवून नेताना त्यांनी तिच्या मुसक्या बांधल्या होत्या. त्यामुळे ती बचावासाठी ओरडू शकली नाही. मध्य प्रदेशातील दातिया या ठिकाणी ही घटना घडली आहे.

बलात्काराचा व्हिडीओ सोशल मीडियावर केला पोस्ट

या दोघांनी जेव्हा अल्पवयीन मुलीला पळवून नेलं त्यानंतर तिथे सत्तेंद्र नावाचा आणखी एकजण आला. त्याने मुलीवर बलात्कार ( Gang Rape ) करतानाची घटना मोबाइलमध्ये रेकॉर्ड केली आणि व्हिडीओ तयार केला. या घटनेनंतर या तिघांनी हा व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला जो व्हायरल झाला. तिघांनी या मुलीला धमकी दिली की या घटनेची कुठे वाच्यता केलीस तर आम्ही तुला ठार करु. ही मुलगी घटनेने खूप घाबरली होती. तिने याबाबत तिच्या घरातल्यांनाही काहीच सांगितलं नाही. मात्र तिच्या भावाने जेव्हा हा व्हिडीओ पाहिला तेव्हा त्याने पोलीस ठाण्यात धाव घेतली.

हे पण वाचा- नालासोपार्‍यात सामूहिक बलात्काराची चौथी घटना, चाकूचा धाक दाखवून विवाहितेवर सामूहिक बलात्कार

पोलिसांनी या प्रकरणी एका आरोपीला अटक केली

पोलिसांनी सामूहिक बलात्काराच्या ( Gang Rape ) या घटनेनंतर गुन्हा दाखल केला. या प्रकरणातल्या एका आरोपीला अटक करण्यात आली आहे तर दुसरे दोघे फरार आहेत. पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. पीडित मुलीच्या कुटुंबानेही व्हायरल व्हिडीओ नंतर पोलीस ठाण्यात धाव घेतली. तसंच मुलीला धीर देत काय घडलं आहे ते विचारलं तेव्हा तिने सगळा प्रकार सांगितला. जसवंत पाल, सत्येंद्र आणि नीरज अहिरवर या तिघांविरोधात पोलिसांनी गु्न्हा दाखल केला. फ्री प्रेस जर्नलने हे वृत्त दिलं आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Gang rape on 17 year old minor girl abducted from field police arrested one scj