Indonesia Earthquake News : इंडोनेशियाची राजधानी जकार्ताला भूकंपाचे धक्क बसले आहे. हा भूकंप ५.६ रिश्टर स्केल तीव्रतेचा असल्याची माहिती समोर येत आहे. यामध्ये २० जणांचा मृत्यू आणि ३०० जण जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. तसेच, या भूकंपामुळे त्सुनामीचा धोका नसल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

राजधानी जकार्तापासून सुमारे ७५ किमी पश्चिम दिशेला असलेले सियांजूर हे भूकंपाचे केंद्र होते. ५.६ रिश्टर सेलाच्या या भूकंपाचा केंद्रबिंदू जमिनीच्या खाली सुमारे १० किमी होता. यामध्ये २० जणांचा मृत्यू झाला असून ३०० जणांवर रुग्णालयात उपचार सुरु आहे. तसेच, अनेक इमारतींचे नुकसान झालं आहे, अशी माहिती सियांजूरचे अधिकारी हर्मन सुहर्मन यांनी दिली आहे.

हेही वाचा : विश्लेषण: भूकंप येणार हे कुत्र्या-मांजरांना व इतर प्राण्यांना माणसांच्या आधीच कसं कळतं?

राष्ट्रीय आपत्ती विभागाकडून काढण्यात आलेल्या निवेदनात सांगितलं की, अनेक घरे, शाळा आणि कार्यालयांचे नुकसान झालं आहे. सियांजूरमधील काही इमारती कोसळल्या आहेत. त्यामुळे ढिगाऱ्याखाली अडकलेल्या लोकांचे बचावकार्य सुरु आहेत. प्रशासनाकडून नुकसानीची माहिती घेण्यात येत आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Indonesia jolts earthquake 5 6 magnitude at least 20 dead 300 injured ssa