भारताच्या माजी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांचं मंगळवारी रात्री हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं. त्यांच्या निधनाची बातमी समजताच सर्व स्तरातून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. प्रसिद्ध उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी, स्वराज यांनी मंगळवारी रात्री ३७० कलम हटवल्यावरुन मोदींचं अभिनंदन केलेल्या ट्विटवर आपली प्रतिक्रीया दिली आहे. RIP Mother India, आता आम्ही तुम्हाला कधीच पाहू शकणार नाही अशा शब्दांत महिंद्रा यांनी स्वराज यांना आदरांजली वाहिली आहे.
इस दिन को देख लिया आप ने लेकिन आपको हम फिर कभी ना देख पाएँगे RIP Mother India…You carry with you the affection of over a billion people. https://t.co/xyJjEBzcJA
— anand mahindra (@anandmahindra) August 6, 2019
मोदी सरकारच्या पहिल्या कार्यकाळात परराष्ट्र मंत्रालयाचा पदभार सांभाळल्यानंतर स्वराज यांनी २०१९ साली निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला. महत्वाची गोष्ट म्हणजे नरेंद्र मोदी सरकारने लोकसभेत जम्मू-काश्मीरसाठीचं ३७० कलम हटवण्याचा निर्णय घेतला. स्वराज यांनी या निर्णयानंतर मंगळवारी उशीरा नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांचं अभिनंदन केलं. मात्र यानंतरच त्यांना हृदयविकाराचा झटका आला, आणि त्यानंतर स्वराज यांना एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं…जिकडे त्यांची प्राणज्योत मालवली.