करोनाची तिसरी लाट आणि देशात ओमायक्रॉन या नवीन विषाणू प्रकाराच्या वाढत्या प्रकरणांच्या भीतीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १५ ते १८ वयोगटातील किशोरवयीन मुलांच्या लसीकरणाची घोषणा शनिवारी केली. तसेच आरोग्य सेवेतील आणि आघाडीवरील कर्मचाऱ्यांबरोबरच ६० वर्षांवरील व्याधीग्रस्तांना वर्धक लसमात्रा (बूस्टर डोस) देण्याचेही मोदी यांनी जाहीर केले. पंतप्रधानांच्या या घोषणेनंतर काँग्रेस नेते राहुल गांधींसह सर्व राजकीय पक्षांच्या नेत्यांच्या प्रतिक्रिया समोर येऊ लागल्या आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मुलांचे लसीकरण ३ जानेवारीपासून; पंतप्रधानांची घोषणा; आरोग्य कर्मचारी, ६० वर्षांवरील व्याधीग्रस्तांना वर्धक लस

राहुल गांधी यांनी पंतप्रधानांच्या या निर्णयाचे समर्थन केलेच पण त्याचे श्रेय घ्यायलाही ते विसरले नाहीत. त्यांनी ट्विट केले आणि म्हटले की ”केंद्र सरकारने बूस्टर डोसची माझी सूचना मान्य केली आहे – हे एक योग्य पाऊल आहे. लस आणि बूस्टरची सुरक्षा देशातील लोकांपर्यंत पोहोचवावी लागेल.” यासोबतच त्यांनी २२ डिसेंबरचे एक ट्विटही शेअर केले, ज्यात ते बूस्टर डोसवरून सरकारवर निशाणा साधला होता.

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आघाडीच्या आरोग्य कर्मचाऱ्यांना कोविड-19 लसीचे बूस्टर डोस देण्याच्या घोषणेवर आनंद व्यक्त केला आणि ते सर्व लोकांना देण्यात यावे, असे सांगितले. केजरीवाल म्हणाले की, आता १५-१८ वयोगटातील मुलांनाही कोविड-19 प्रतिबंधात्मक लस दिली जाईल हे जाणून मला आनंद झाला. या आठवड्याच्या सुरुवातीला, केजरीवाल यांनी केंद्राकडे ज्यांचे दोन्ही डोस झालेले आहेत्या अशा व्यक्तींना कोविड -19 लसीच्या बूस्टर डोसची परवानगी देण्याची विनंती केली होती.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rahul gandhi responds to pm modis new decision on vaccination msr