अहमदाबाद : ज्येष्ठ महिला हक्क कार्यकर्त्यां आणि ‘सेल्फ एम्प्लॉइड वुमेन्स असोसिएशन’च्या (सेवा) संस्थापिका इलाबेन भट यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. त्या ८९ वर्षांच्या होत्या. सेवा भारत या संस्थेने ट्विटरच्या माध्यमातून याबाबत माहिती दिली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इलाबेन यांना आदरांजली वाहिली. ‘इलाबेन भट यांच्या निधनाबाबत ऐकून दु:ख झाले. महिला सक्षमीकरण, सामाजिक कार्य आणि तरुणांमध्ये शिक्षणाचा प्रसार व्हावा यासाठी केलेल्या कामासाठी त्या दीर्घकाळ स्मरणात राहतील. त्यांचे कुटुंबीय आणि सहकाऱ्यांचे सांत्वन करतो,’ असे ट्वीट पंतप्रधानांनी केले. गांधीवादी कार्यकर्त्यां असलेल्या इलाबेन यांनी १९७२ साली सेवा संस्थेची स्थापना केली. १९९६ पर्यंत सरचिटणीस म्हणून त्यांनी संस्था नावारूपाला आणली.

मार्च २०१५ ते ऑक्टोबर २०२२ असा दीर्घकाळ गुजरात विद्यापीठाच्या कुलगुरू म्हणून त्यांनी काम केले. त्यांना १८८५ साली पद्मश्री आणि १९८६ साली पद्मभूषण पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले. आंतरराष्ट्रीय स्तरावर रामन मॅगसेसे पुरस्कार, रॅडक्लिफ पुरस्कारांनी त्यांना गौरवण्यात आले होते.  अमेरिकेच्या माजी परराष्ट्रमंत्री हिलरी क्लिंटन यांनी इलाबेन यांचा उल्लेख ‘आपल्या आयुष्यातील हिरो’ असा केला होता.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sewa founder and gandhian elaben bhatt passes away zws