"त्याने आमच्या बहिणीचे ३५ तुकडे केले, आम्ही त्याचे..." आफताबवर तलवारीने हल्ला करण्यासाठी आलेल्या व्यक्तीचं विधान | sword attack on aftab poonawala forensic lab delhi Will chop him into 70 pieces rmm 97 | Loksatta

VIDEO: “त्याने आमच्या बहिणीचे ३५ तुकडे केले, आम्ही त्याचे…” आफताबच्या वाहनावर तलवारीने हल्ला करणाऱ्या व्यक्तीची धमकी

श्रद्धा वालकरची हत्या करणारा आरोपी प्रियकर आफताब पुनावाला याच्यावर हिंदू सेनेच्या काही कार्यकर्त्यांनी सोमवारी (२८ नोव्हेंबर) तलवारीने हल्ला केला.

VIDEO: “त्याने आमच्या बहिणीचे ३५ तुकडे केले, आम्ही त्याचे…” आफताबच्या वाहनावर तलवारीने हल्ला करणाऱ्या व्यक्तीची धमकी
फोटो/लोकसत्ता ग्राफिक्स टीम

दिल्लीत प्रेयसी श्रद्धा वालकरची हत्या करणारा आरोपी प्रियकर आफताब पुनावाला याच्यावर हिंदू सेनेच्या काही कार्यकर्त्यांनी सोमवारी (२८ नोव्हेंबर) तलवारीने हल्ला केला. आफताबची पॉलीग्राफ चाचणी झाल्यानंतर त्याला रुग्णालयातून पुन्हा तुरुंगात नेलं जात होतं. त्याचवेळी हा तलवारीने हल्ला करण्याचा प्रयत्न झाला. यावेळी हल्लेखोरांना रोखण्यासाठी पोलिसांना हवेत गोळीबार करावा लागला, तरीही एका व्यक्तीने पोलिसाच्या वाहनावर तलवारीने हल्ला करण्याचा प्रयत्न केला.

याप्रकरणी पोलिसांनी दोन जणांना ताब्यात घेतलं असून कुलदीप ठाकूर आणि निगम गुज्जर अशी त्यांची नावं आहेत. दोघंही गुरुग्राम येथील रहिवाशी असून ते कारने घटनास्थळी आले होते. त्यांच्यासोबत आणखी तीन ते चार लोकं होती, या हल्ल्यात संबंधित लोकांचा सहभाग आढळल्यास त्यांच्यावरही कायदेशीर कारवाई केली जाईल, अशी माहिती रोहिणीच्या डीसीपींनी दिली आहे.

हेही वाचा- VIDEO: धक्कादायक! श्रद्धा वालकर हत्या प्रकरणातील आरोपी आफताबवर तलवारीने हल्ला करण्याचा प्रयत्न

‘इंडिया टुडे’शी संवाद साधताना हल्लेखोराने म्हटलं की, “त्याने (आफताब) आमच्या बहिणीची हत्या केली आणि तिचे ३५ तुकडे केले. आम्ही त्याचे ७० तुकडे करू. जर आमच्या बहिणी आणि मुली असुरक्षित असतील तर आम्ही कशासाठी जिवंत राहायचं, आम्ही त्याला ठार करू” असा धमकीवजा इशारा हल्लेखोराने दिला आहे.

पाहा व्हिडीओ:

या हल्ल्यानंतर हिंदू सेनेनं परिपत्रक जारी करत संघटनेची भूमिका स्पष्ट केली आहे. “या कार्यकर्त्यांनी जे काही केलं, ते त्यांचं वैयक्तिक कृत्य आहे. आफताबने एका हिंदू मुलीचे तुकडे कसे केले? ते संपूर्ण देशानं पाहिलं आहे. आमची संघटना भारतीय संविधानाच्या विरोधातील कोणत्याही कृत्याचं समर्थन करत नाही, आमचा भारताच्या कायद्यावर पूर्णपणे विश्वास आहे” असं हिंदू सेनेनं परिपत्रकात म्हटलं आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 28-11-2022 at 22:55 IST
Next Story
हायकोर्ट नगर रचनाकार आहे का? सर्वोच्च न्यायालयाची उच्च न्यायालयाच्या ‘त्या’ आदेशाला स्थगिती