काही विशिष्ट औषधांच्या किमती कमी करून विकण्याचा निर्णय झाल्यास औषधनिर्मात्या कंपन्यांनी त्याची तातडीने अंमलबजावणी करून विक्री न झालेली ती औषधे पूर्वीच्याच किमतींना विकू नये, असा महत्त्वपूर्ण निर्णय सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी दिला.
काही विशिष्ट औषधे खूप महाग असतात. ती सर्वसामान्यांना स्वस्त दरात उपलब्ध व्हावीत यासाठी त्यांच्या किमती कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला तर औषधनिर्मात्या कंपन्यांनी १५ दिवसांच्या आत नव्या किमती लागू कराव्यात आणि विक्री न झालेली औषधे आधीच्याच किमतीने विकू नयेत, असे सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश आर. एम. लोढा आणि कुरियन जोसेफ यांच्या खंडपीठाने स्पष्ट केले.
महाग औषधे कमी किमतीत विकण्याचे आदेश निघाल्यास नवी किंमत महिन्याच्या १५ तारखेनंतर लागू व्हावी व त्याआधी विक्री न झालेली औषधे सुधारित किमतीला न विकता त्यांच्या मूळ किमतीलाच विकण्याची परवानगी असावी, अशी याचिका औषधनिर्मात्या कंपन्यांनी दाखल केली होती.
संग्रहित लेख, दिनांक 11th Dec 2013 रोजी प्रकाशित
औषधांचे सुधारित दर तातडीने लागू करा: सर्वोच्च नायायालय
काही विशिष्ट औषधांच्या किमती कमी करून विकण्याचा निर्णय झाल्यास औषधनिर्मात्या कंपन्यांनी त्याची तातडीने अंमलबजावणी करून विक्री न झालेली ती औषधे पूर्वीच्याच किमतींना विकू नये,
आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Already have a account? Sign in
First published on: 11-12-2013 at 12:56 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: The revised rate of medicines apply immediately supreme court