पती पत्नीमध्ये लहान मोठ्या कारणांवरुन वाद होणं काही नवीन नाही. मात्र या वादानंतर रागाच्या भरात एका व्यक्तीने थेट आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना गुजरातमधील अहमदाबादमध्ये घडली आहे. दुपारच्या जेवणाला काय करायचं यावरुन पत्नीबरोबर वाद झाल्यानंतर पत्नीने बाल्कनीमधून उडी मारुन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. मात्र सुदैवाने काही जणांनी या व्यक्तीला पकडून वर खेचल्याने पुढील अनर्थ टळला. यासंदर्भातील वृत्त टाइम्स ऑफ इंडियाने दिलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

लॉकडाउनमुळे अनेकजण घरीच आहेत. त्यामुळे अनेक घरांमध्ये मानसिक ताण वाढल्याने लहान मोठ्या कारणांवरुन वाद होताना दिसत आहे. पत्नीबरोबर झालेल्या अशाच एका वादानंतर अहमदाबादमधील एका व्यक्तीने थेट बाल्कनीमधून खाली उडी मारण्याचा प्रयत्न केला. शेजऱ्यांनी वेळीच धाव घेत या व्यक्तीला खेचून वर काढल्याने त्याचा जीव वाचला. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये एक व्यक्ती इमारतीच्या ग्रील नसलेल्या बाल्कनीमध्ये उभी असल्याचे दिसत आहे. तर वरुन खिडकीमधून काही व्यक्ती हात देऊन या व्यक्तीला वर खेचण्याचा प्रयत्न करत असल्याचेही व्हिडिओमध्ये दिसत आहे. या व्यक्तीला वर खेचताना शेजऱ्यांना चांगलेच कष्ट घ्यावे लागेल. जवळजवळ २० सेकंद ही व्यक्ती अंधांतरी लटकताना व्हिडिओमध्ये दिसतं आहे.

लॉकडाउनमुळे सातत्याने घरात थांबून अनेकांवरील मानसिक ताण वाढल्याचे चित्र दिसत आहे. मानसिक ताण कमी करण्यासाठी तज्ज्ञांचा सल्ला घेणाऱ्यांचे प्रमाण वाढल्याचेही सांगितले जात आहे. त्यामुळेच

जानेवारी महिन्यामध्ये दिल्लीमध्येही अशीच एक विचित्र घटना घडली होती. येथील ३२ वर्षीय चमन नावाच्या रिक्षा चालकाने झाडाला गळाफास घेऊन आत्महत्या केली होती.पत्नीबरोबर झालेल्या वादानंतर या व्यक्तीने पत्नीच्या डोक्यात हतोडी मारुन तिच्यावर हल्ला केला होता. यामुळे आपल्याला आता शिक्षा होईल या भितीने चमनने आत्महत्या केली होती. चमनच्या पत्नीचे हे दुसरे लग्न होते. तिला पहिल्या नवऱ्यापासून तीन मुलं होती. यावरुनच चमन आणि तिच्यामध्ये वाद व्हायचे असं पोलिसांनी सांगितलं होतं.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Viral video ahmedabad man attempts suicide after disagreement with wife over lunch menu scsg