काजू आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहेत. ड्रायफ्रुट्समध्ये काजू हा असा एक ड्रायफ्रूट आहे, जो जवळपास सगळ्यांनाच आवडतो. मात्र याची किंमत प्रचंड महाग असते. जेव्हा तुम्ही बाजारातून काजू खरेदी करता तेव्हा ते तुम्हाला ८०० रुपये किंवा १००० रुपये प्रति किलो दराने मिळतात. यामुळेच सर्वसामान्य माणस काजू खाण्यापासून वंचित राहतात. तुम्हाला कदाचित माहित नसेल की बहुतेक ठिकाणी जास्त किंमतीत विकले जाणारे काजू भारतातीलच एका शहरात अगदी कमी किंमतीत विकले जातात. हे जाणून तुम्हाला नक्कीच आश्चर्य वाटेल, परंतु भारतीय बाजारपेठेत ८०० ते १००० रुपये किलोने विकले जाणारे काजू या शहरात केवळ ३० ते ५० रुपये किलोने विकले जातात.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

काजू इतके स्वस्त का मिळतात?

झारखंड राज्यातील जामताडा जिल्ह्यात काजू बटाटे, कांदे आणि इतर भाज्यांप्रमाणेच मिळतात. आता तुमच्या मनात प्रश्न येत असेल की इथे इतके स्वस्त काजू का मिळतात? खरं तर झारखंडमध्ये दरवर्षी हजारो टन काजूचे उत्पादन होते. जामताडा जिल्हा मुख्यालयापासून चार किलोमीटर अंतरावर सुमारे ४९ एकर विस्तीर्ण शेतजमिनीवर काजूची लागवड केली जाते. येथे सुक्या मेव्याच्या मोठ्या बागा आहेत. येथे काम करणारे लोक हे सुका मेवा अत्यंत स्वस्त दरात विकतात.

आश्‍चर्यकारक बाब म्हणजे असे असतानाही आपल्याला काजू महागड्या दरात मिळतात. काजूच्या वाढत्या किमतीमुळे, इतर देशातील शेतकरी देखील काजूची लागवड करू इच्छितात. याठिकाणी काजू बटाटे आणि कांद्याच्या भावात मिळतात हे जेव्हा लोकांना कळलं, तेव्हापासून इथं लोकांची ये-जा सुरू झाली.

( हे ही वाचा: भारतातील ‘या’ रहस्यमय दरीत गेलेली व्यक्ती पुन्हा परत येत नाही; ठिकाणाचे नाव वाचून तुम्हीही व्हाल थक्क)

काजूच्या शेतीची सुरुवात कशी झाली?

शेतकऱ्यांकडे या शेतीसाठी फारशा मुलभूत सुविधा नसल्या तरी शेतकरी त्यात खूश आहेत. जामताडा येथील लोकांचे म्हणणे आहे की, काही वर्षांपूर्वी जामताडा येथील माजी उपायुक्तांनी ओडिशातील कृषी शास्त्रज्ञांकडून जमिनीची चाचणी घेतल्यानंतर येथे सुकामेव्याची लागवड सुरू केली होती. काही वर्षांतच येथे काजूची चांगली वाढ होऊ लागली, परंतु सुरक्षा आणि देखरेखीसाठी पुरेशी व्यवस्था नसल्यामुळे बरेचसे पीक एकतर चोरीला जाते किंवा मळ्यातील कामगार ते स्वस्त दरात विकू लागतात.

मराठीतील सर्व FYI बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Cashews are available very cheap in jamtara jharkhand know the intresting reason behind it gps
First published on: 04-02-2023 at 17:17 IST