बँकेच्या चेकबुकशी संबंधित नियम प्रत्येक खातेदाराला माहीत असणे आवश्यक आहे. जर तुमच्याकडे बँकेसंबंधित नियमांची योग्य माहिती नसेल, तर तुमची मोठी फसवणूक होऊ शकते. यामुळे बँकेचे चेक हाताळताना योग्य माहिती असणे आवश्यक आहे. यात चेकवर कुठे सही करायची असते? यात कोणाला चेक द्यायचा असेल तर कोणत्या बाजूला सही करावी लागते? याची माहिती असणे आवश्यक असते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

जर एखाद्या व्यक्तीला सही करून चेक दिला, तर त्यामुळे तुमचे काही आर्थिक नुकसान होऊ शकते का? तसेच ते टाळण्यासाठी काय उपाय केले पाहिजे जाणून घेऊ…..

चेकच्या मागील बाजूस सही करताना ‘या’ गोष्टी लक्षात ठेवा?

चेक ही वित्तीय संस्था किंवा वैयक्तिक रोख पैसे काढण्याची लेखी हमी असते. एका खात्यातून दुसर्‍या खात्यात निश्चित रक्कम भरण्याचा चेक हा बँकेचा लेखी आदेश असतो. चेकमुळे दोन खातेधारकांमधील व्यवहार सुरक्षित आणि सोयीने होतात. यामुळे चेकवर सही करण्यालाही काही नियम असतात. चेकवर किंवा त्याच्या मागे सही करण्याला बँकेच्या भाषेत विशेष अर्थ आहे. सर्वच चेकवर मागच्या बाजूस सही करायची नसते. कारण फक्त बेअरर चेकवरच मागच्या बाजूस सही केली जाते. बेअरर चेक हा अशा प्रकारचा चेक आहे, जो बँकेत जमा केला जातो आणि त्यावर कोणत्याही व्यक्तीचे नाव नसते. त्या चेकच्या मदतीने कोणीही बँकेतून पैसे काढू शकतो. बँक खातेधारकाच्या सहमतीने जारी केलेले बेअरर चेक मान्य करते. नियमानुसार, अशा चेकमुळे झालेल्या फसवणुकीला बँक जबाबदार नसते.

चेकसंबंधित ‘हे’ नियम लक्षात ठेवा

१) चेक चालू किंवा बचत खात्यासाठी जारी केला जाऊ शकतो.
२) चेकवर नाव असलेला प्राप्तकर्ताच त्याच्या माध्यमातून व्यवहार करू शकतो.
३) चेकवर तारीख नसेल तर तो चेक अवैध मानला जातो.
४) बँक चेक जारी केल्याच्या तारखेपासून तीन महिन्यांसाठी वैध असतो.
५) चेकच्या तळाशी एक ९ अंकी MICR कोड आहे जो चेक क्लिअरन्स प्रक्रिया सुलभ करतो.
६) चेकची रक्कम शब्द आणि अंक दोन्हीमध्ये नीट लिहिली पाहिजे.
७) चेक देणाऱ्या व्यक्तीने चेकवर ओव्हरराईट न करता सही करणे आवश्यक आहे.
८) चेकवर पैसे देणाऱ्याचे नाव अचूक लिहिलेले असावे.

मराठीतील सर्व FYI बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Cheque signature rules when sign on the back of a cheque book all you need to know here sjr