कोल्हापूर : हिंदू धर्म संपून टाकण्याची तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टालिन यांची ही भाषा शरद पवार, उद्धव ठाकरे, काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांना केला मान्य आहे का असा प्रश्न भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी इचलकरंजी येथील सभेत केला.निवडणुकीमध्ये हिंदू धर्म संस्कार संस्कृती मोडून तोडून टाकण्याची भाषा करणाऱ्याला धडा शिकवण्याकरता कार्यकर्त्यांनी आजपासून तयारी करा, मासे आव्हाने त्यांनी यावेळी केले.
या देशाचे पंतप्रधान त्याला विचारलं की देशाचे पंतप्रधान कोण तर मोदीजी पाहिजे त्याला विचारलं कारण काय त्यांनी सांगितलं आत्मनिर्भर भारताचा संकल्प मोदीजींनी केला आहे म्हणून मी मोदीजीला मत देणार आहे अशा लोकभावना असल्याचे आज मला लोकांशी संवाद साधताना दिसून आले असेही बावनकुळे म्हणाले.
हेही वाचा >>>समाज घटकांनी भाजपशी सामावून घ्यावे; चंद्रशेखर बावनकुळे यांचे इचलकरंजीत आवाहन
१४० कोटी भारतीयाच्या संसदेमध्ये लोकसभेमध्ये १९१ महिला खासदार राहणार. महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये १०० महिला आमदारांना विधानसभेमध्ये तुमचे रक्षण करण्याकरता ही महिला शक्ती येणार आहे. मोदीजींच्या नेतृत्वामध्ये आज महिलांना मोठा सन्मान मिळाला आहे आणि म्हणून सर्वच महिलांना निर्णय घेतला सर्वात पहिला निर्णय घेतला, असे बावनकुळे यांनी सांगितले.