भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या अध्यक्षपदी असणाऱ्या सौरव गांगुलची आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (म्हणजेच आयसीसीच्या) क्रिकेट समितीच्या अध्यक्षपदी नियुक्ती झालीय. आयसीसीच्या गव्हर्निंग बॉडीने बुधवारी म्हणजेच १७ नोव्हेंबर २०२१ रोजी यासंदर्भातील माहिती दिली. गांगुलीने त्याचा माजी सहकारी अनिल कुंबळेची जागा घेतली. २०१२ पासून कुंबळे या पदावर कार्यरत होता. आयसीसीचे अध्यक्ष ग्रेग बार्कले यांनी मला आयसीसीच्या पुरुष क्रिकेट समितीच्या अद्यक्षपदी सौरव गांगुलीचं स्वागत करताना फार आनंद होतोय, असं म्हटलंय.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नक्की वाचा >> पाकिस्तानी संघाच्या ‘त्या’ कृतीमुळे बांगलादेशात नवा वाद; मालिका रद्द करुन पाकिस्तानी खेळाडूंना हकलवून देण्याची मागणी

आयसीसीच्या अध्यक्षांनी, “जगातील सर्वोत्तम खेळाडूंपैकी एक आणि नंतर एक प्रशासकीय जबाबदारी स्वीकारणारी व्यक्ती म्हणून सौरव गांगुलीचा अनुभव आयसीसीला पुढे जाण्यासाठी आणि क्रिकेट संदर्भातील निर्णयांना योग्य दिशा देण्यासाठी महत्वाचा ठरेल. मागील ९ वर्षांपासून अनिल कुंबळेने या पदावर असताना केलेल्या कामासाठी मी त्याचे आभार मानतो. कुंबळेच्या कालावधीमध्ये डीआरएस अधिक नियमतपणे वापरण्यापासून त्यात वेळोवेळी सुधारणा करत गेल्याने आंतरराष्ट्रीय स्तरावरील क्रिकेटमध्ये सुधारणा झालीय. तसेच गोलंदाजीच्या शैलीसंदर्भातही या काळात निर्णय घेण्यात आले,” असं बार्कले म्हणालेत.

नक्की वाचा >> विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात पराभूत झाल्यानंतर ‘तो’ म्हणाला, “३३५ दिवस”; पण या ट्विटचा अर्थ काय?

आयसीसीची क्रिकेट समिती क्रिकेटच्या खेळामधील महत्वाचे बदल, नियम आणि क्रिकेटचा अधिक अधिक प्रसार करण्यासंदर्भातील धोरणात्मक निर्णय़ घेण्याआधी त्यासंदर्भात विचार विनिमय करणं आणि ते निर्णय अंमलात आणण्यासंदर्भातील काम करते.

नक्की पाहा >> संपूर्ण जग कौतुक करत असताना वॉर्नर मात्र विल्यमसनच्या कामगिरीवर झाला फिदा; Insta Story चा Screenshot व्हायरल

आयसीसीने मंगळवारी अनेक महत्वाचे निर्णय घेतले त्यामध्ये सर्वात महत्वाचा निर्णय अफगाणिस्तानमध्ये सत्तांतर झाल्यानंतर तेथील क्रिकेटच्या परिस्थितीचा समिक्षा करण्यासाठी एका कार्यकालीन गटाची स्थापना करण्यात आलीय. तालिबानने अफगाणिस्तानमध्ये सत्ता मिळवल्यानंतर येथील क्रिकेटच्या भविष्यासंदर्भात चिंता व्यक्त केली जात आहे. खास करुन महिला क्रिकेटवरील संकटाबद्दल जगभरातील क्रिकेट जाणकार चिंतेत आहेत. महिलांना क्रिकेट खेळू न देण्याच्या तालिबानच्या भूमिकेमुळे ऑस्ट्रेलियाने अफगाणिस्तान पुरुष संघासोबतचा एकमेव कसोटी सामना रद्द केलाय.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bcci president sourav ganguly replaces anil kumble as chairman of icc cricket committee scsg