Duleep Trophy 2024 Dhruv Jurel equaled MS Dhoni record : बांगलादेशविरुद्धच्या कसोटी मालिकेला १९ सप्टेंबरपासून सुरुवात होणार आहे. या कसोटी मालिकेपूर्वी दुलीप ट्रॉफी २०२४ भारतात खेळवली जात आहे. जिथे भारताचे अनेक स्टार खेळाडू खेळत आहेत. या काळात यष्टिरक्षक ध्रुव जुरेलने अप्रतिम कामगिरी केली आहे. अलीकडेच, भारत अ संघाचा यष्टीरक्षक ध्रुव जुरेलने दुलीप करंडक भारत ब विरुद्धच्या सामन्यादरम्यान यष्टीच्या मागे एक मोठा पराक्रम करत एमएस धोनीच्या विक्रमाशी बरोबरी साधली.

बंगळुरूच्या एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या सामन्यात ध्रुव जुरेलने दुसऱ्या डावात सात झेल घेतले. त्याने एका डावात यष्टीरक्षक म्हणून सर्वाधिक झेल घेण्याच्या बाबतीत माजी भारतीय कर्णधार एमएस धोनीच्या विक्रमाशी बरोबरी साधली. धोनीने २००४-०५ मध्ये पूर्व विभागाकडून खेळताना एका डावात ७ झेल घेतले होते. आता या यादीत धोनीसह जुरेलही पहिल्या स्थानावर कायम आहे. जुरेलच्या फलंदाजीबद्दल बोलायचे झाले, तर पहिल्या डावात त्याच्या बॅटमधून फक्त २ धावा झाल्या होत्या.

धोनीने २००४ मध्ये केला होता हा विक्रम –

हा विक्रम एमएस धोनीने २००४-०५ मध्ये दुलीप ट्रॉफी दरम्यान केला होता. पूर्व विभागाकडून खेळणाऱ्या धोनीने मध्य विभागाविरुद्ध सात झेल घेत सुनील बेंजामिनचा विक्रम मोडला होता. १९७३ दुलीप ट्रॉफी फायनलमध्ये सेंट्रल झोनकडून खेळणाऱ्या बेंजामिनने उत्तर विभागाविरुद्ध सहा झेल आणि एक स्टंपिंग केले होते. धोनी आणि जुरेल या दोघांनीही या विक्रमाची बरोबरी केली आहे, तर बेंजामिनचा विक्रम आता तिसऱ्या स्थानावर आहे.

हेही वाचा – ENG vs SL Test : जो रुटने कुमार संगकाराला मागे टाकत केला मोठा पराक्रम, ‘ही’ कामगिरी करणारा ठरला जगातील सहावा खेळाडू

रविवारी खेळल्या गेलेल्या या सामन्यात जुरेलच्या उत्कृष्ट यष्टीरक्षणामुळे भारत अ संघाला १८४ धावांवर रोखता आले. जुरेलने यशस्वी जैस्वाल, अभिमन्यू इसवरन, मुशीर खान, सर्फराझ खान, नितीश रेड्डी, साई किशोर आणि नवदीप सैनी यांचा झेल घेत त्यांना तंबूता रस्ता दाखवला. विशेष म्हणजे रविवारी बीसीसीआयने बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या कसोटीसाठी जाहीर करण्यात आलेल्या भारतीय संघात जुरेला स्थान देण्यात आले आहे.

हेही वाचा – DPL 2024 Final : ईस्ट दिल्ली रायडर्सने पटकावले पहिले जेतेपद, मयंक रावत ठरला विजयाचा शिल्पकार

भारत अ संघाने पहिल्या डावात केल्या होत्या २३१ धावा –

या सामन्यात पहिल्या डावात फलंदाजी करताना भारत अ संघाने १० गडी गमावून २३१ धावा केल्या. भारत अ संघाकडून पहिल्या डावात एकाही फलंदाजाला शतक किंवा अर्धशतक झळकावता आले नाही. पहिल्या डावात केएल राहुलने सर्वाधिक ३७ धावांची खेळी केली. याशिवाय मयंक अग्रवालने ३६, कर्णधार शुबमन गिलने २५, रियान परागने ३० आणि तनुषने ३२ धावा केल्या. याशिवाय भारत ब संघाकडून गोलंदाजी करताना मुकेश कुमारने १९ षटकांत ६२ धावा देत ३ विकेट्स घेतल्या. नवदीप सैनीने १६ षटकांत ६० धावा देत ३ विकेट्स घेतल्या होत्या.