Rohit Sharma became first player to hit 50 sixes against 6 international teams : टी-२० विश्वचषक २०२४ च्या सुपर ८ फेरीत टीम इंडिया बांगलादेशविरुद्ध दुसरा सामना खेळत आहे. उभय संघांमधील हा सामना अँटिगा येथील सर व्हिव्हियन रिचर्ड्स स्टेडियमवर खेळला जात आहे, जिथे टीम इंडिया नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करत आहे. टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने या सामन्यात चांगली खेळी केली आहे. या खेळीदरम्यान रोहित शर्माने ख्रिस गेलचा एक मोठा विक्रमही मोडला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

रोहित शर्माने केला मोठा विक्रम –

या सामन्यात रोहित शर्माने ११ चेंडूत २३ धावांची खेळी केली. यादरम्यान रोहित शर्माने ३ चौकार आणि १ षटकार लगावला. यासह त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये बांगलादेश संघाविरुद्ध ५० षटकार पूर्ण केले. अशा प्रकारे रोहितने आतापर्यंत ६ वेगवेगळ्या आंतरराष्ट्रीय संघांविरुद्ध ५० षटकार ठोकले आहेत. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ६ वेगवेगळ्या संघांविरुद्ध ५० षटकार मारणारा तो पहिला फलंदाज ठरला आहे. त्याने ख्रिस गेलला मागे टाकले आहे. ख्रिस गेलने पाच वेगवेगळ्या संघांविरुद्ध ही कामगिरी केली होती.

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक संघांविरुद्ध ५० किंवा त्याहून अधिक षटकार मारणारे फलंदाज –

६ संघांविरुद्ध – रोहित शर्मा<br>५ संघांविरुद्ध – ख्रिस गेल
३ संघांविरुद्ध – शाहिद आफ्रिदी<br>३ संघांविरुद्ध – एमएस धोनी
३ संघांविरुद्ध – ब्रेंडन मॅक्युलम

हेही वाचा – T20 WC 2024 : “विराट आधी केलेल्या चुका…”, कोहलीच्या ‘फ्लॉप’ फॉर्मवर नवज्योत सिंग सिद्धूचे मोठे वक्तव्य

भारताने बांगलादेशला दिले १९७ धावांचे लक्ष्य –

सामन्याबद्दल बोलायचे, तर नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजीला आलेल्या भारतीय संघाची सुरुवात चांगली झाली होती, मात्र कर्णधार रोहित शर्माला ही भागीदारी आणखी मोठी करता आली नाही आणि तो शाकिब अल हसनच्या चेंडूवर बाद झाला. रोहितच्या विकेटसह शाकिब टी-२० वर्ल्ड कपमध्ये ५० विकेट्स पूर्ण करणारा पहिला गोलंदाज ठरला. खराब फॉर्ममध्ये असलेल्या विराट कोहलीची बॅटही या सामन्यात तळपली आणि त्याने २४ चेंडूत ३६ धावांची खेळी केली.

हेही वाचा – T20 WC 2024 : पंतची गिलख्रिस्टशी तुलना करण्यावर माजी खेळाडूचे मोठे वक्तव्य; म्हणाला, ‘त्याच्यासारखा बनण्यासाठी पंतला अजून…’

हार्दिकनंतर कोहली भारतासाठी सर्वाधिक धावा करणारा दुसरा खेळाडू होता, पण त्याचे अर्धशतक हुकले. त्याचवेळी शिवम दुबेने हार्दिक पांड्याला चांगली साथ दिली आणि २४ चेंडूत ३४ धावांची खेळी खेळली. एकेकाळी भारतीय संघ २०० धावांचा टप्पा पार करेल असे वाटत होते, मात्र बांगलादेशचे गोलंदाज काही प्रमाणात पुनरागमन करण्यात यशस्वी ठरले. भारताकडून उपकर्णधार हार्दिक पंड्याने २७ चेंडूत ४ चौकार आणि ३ षटकाराच्या मदतीने नाबाद ५० धावा केल्या.

मराठीतील सर्व T20 World Cup बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rohit sharma becames first player to hit 50 sixes against 6 international teams ind vs ban match in t20 wc vbm