Ian Smith says comparing Rishabh to Gilchrist is unfair : न्यूझीलंडचा माजी क्रिकेटपटू इयान स्मिथच्या मते, ऋषभ पंतची ॲडम गिलख्रिस्टशी इतक्यात तुलना करणे खूप घाईचे ठरेल. परंतु भारतीय यष्टीरक्षक फलंदाजाने आपला सध्याचा फॉर्म कायम ठेवल्यास तो ऑस्ट्रेलियन दिग्गजांच्या जवळ जाऊ शकतो. स्मिथ स्वत: यष्टीरक्षक फलंदाज आहे आणि कार अपघातातून सावरल्यानंतर पंतने ज्या प्रकारे पुनरागमन केले त्यामुळे तो खूप प्रभावित झाला आहे.

ऋषभ पंतबद्दल इयान स्मिथ काय म्हणाला?

ऋषभ पंतने आयपीएलमध्ये चांगली कामगिरी केली आणि टी-२० विश्वचषकातही तो विकेटसमोर आणि विकेटच्या मागे आपली भूमिका चोख बजावत आहे. ऋषभ पंतची गणना सध्या जागतिक क्रिकेटमधील सर्वात प्रतिभावान क्रिकेटपटूंमध्ये केली जाते. ऋषभ पंतने ऑस्ट्रेलिया, इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिकेत कसोटी शतके झळकावली आहेत, परंतु आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १५,००० हून अधिक धावा आणि ८०० हून अधिक झेल घेतलेल्या गिलख्रिस्टशी बरोबरी करण्यासाठी त्याला अजून बराच पल्ला गाठायचा आहे.

navneet rana uddhav thackeray
“मी पराभूत झालेय, उद्धव ठाकरेंनी आता तरी…”, नवनीत राणांचं वक्तव्य चर्चेत
Rohit Sharma Statement on India Win
IND vs ENG: टीम इंडियाच्या फायनल प्रवेशासह रोहित शर्माचे विराट कोहलीवर मोठे वक्तव्य; म्हणाला, “१५ वर्ष खेळलेल्या…”
Suryakumar Yadav and Rashid Khan Banter After Surya sweep Shot Video Viral
VIDEO: सूर्यकुमारच्या सारख्या फटक्यांमुळे रशीद वैतागला; थेट त्याच्याकडे जाऊन म्हणाला, “मला स्वीप मारणं बंद कर”!
South African fans object to Surya's catch
सूर्यकुमार यादवच्या ‘कॅच’वरुन पेटला नवा वाद, दक्षिण आफ्रिकन चाहत्याने VIDEO शेअर करत केला फसवणूक झाल्याचा दावा
Rohit Sharma abused Rishabh Pant and badly scolds for Dropped Easy Catch of Mitchell Marsh Video Viral
ऋषभ पंतने सोपा झेल सोडल्याचे पाहता रोहितने भर मैदानात घातली शिवी, रागाने लालबुंद झालेल्या कॅप्टनचा VIDEO व्हायरल
Rohit Sharma Reaction Before Suryakumar Yadav Catch
मिलरचा शॉट अन् आशा सोडलेला रोहित… सूर्यकुमार यादवने तो कॅच घेण्याआधी रोहितच्या मैदानावरील प्रतिक्रियेचा VIDEO व्हायरल
Rape case Story
१२ व्या वर्षी गँगरेप, १३व्या वर्षी मातृत्त्व; २४ वर्षांनी त्याच मुलाने आईचे पांग फेडले, नराधमांना शोधून घेतला बदला!
How can South Africa get knocked out in Super 8
T20 WC 2024: आतापर्यंत सगळे सामने जिंकलेल्या दक्षिण आफ्रिकेला गाशा गुंडाळावा लागू शकतो, असं आहे समीकरण

ॲडम गिलख्रिस्टशी होत आहे तुलना –

टी-२० विश्वचषकात समालोचकाची भूमिका बजावत असलेला इयान स्मिथ म्हणाला, ‘ऋषभ पंतने अपघातानंतर जोरदार पुनरागमन केले असून तो उत्कृष्ट फॉर्ममध्ये दिसत आहे. तो अतिशय कुशल खेळाडू आहे. तो आक्रमक आणि एक धोकादायक खेळाडू आहे.’ ॲडम गिलख्रिस्टप्रमाणेच पंतनेही दाखवून दिले आहे की तो प्रत्येक फॉरमॅटमध्ये कोणत्याही क्रमांकावर फलंदाजी करू शकतो. त्याला टी-२० विश्वचषकात तिसऱ्या क्रमांकावर पाठवले जात असून आतापर्यंत त्याने हा निर्णय योग्य असल्याचे सिद्ध केले आहे.

हेही वाचा – IND vs BAN Live Score, T20 World Cup 2024 : भारत-बांगलादेश सामन्यावर पावसाचे सावट, अँटिगामध्ये कोण मारणार बाजी?

ऋषभला तिसऱ्या क्रमांकावर उतरवण्याचा निर्णय योग्यच –

इयान स्मिथ पुढे म्हणाला, ‘तो कोणत्याही खेळाडूसह चांगला खेळू शकतो, मग तो विराट कोहली असो किंवा रोहित शर्मा. त्यामुळे त्याला तिसऱ्या क्रमांकावर उतरवण्याचा निर्णय योग्यच आहे, कारण मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये तुमच्या सर्वोत्तम खेळाडूला अधिक चेंडूंचा सामना करण्याची संधी मिळायला हवी. यामुळेच तो खास बनतो, असे माझे मत आहे.’

केएल राहुल देखील जागतिक दर्जाचा क्रिकेटपटू –

माजी खेळाडू म्हणाला, ‘तो पहिलाच चेंडू फटकावत सीमारेषेच्या बाहेर पोहोचवू शकतो. त्याच्याकडे धावा करण्यासाठी इतर पर्यायही आहेत. त्याने केएल राहुलसारख्या चांगल्या खेळाडूची जागा घेतली आहे. केएल राहुल हा जागतिक दर्जाचा क्रिकेटपटू आहे आणि त्याची जागा घेणे खूप महत्त्वाचे आहे.’ तथापि, या २६ वर्षीय क्रिकेटरची गिलख्रिस्टशी तुलना करण्यासाठी आपल्याला प्रतीक्षा करावी लागेल.

हेही वाचा – IND vs BAN : भारतासाठी विजय आवश्यक, पावसामुळे सामना रद्द झाला किंवा हरला तर काय होणार? जाणून घ्या समीकरण

गिलख्रिस्ट आणि पंत दोघेही सारखेच –

माजी खेळाडू स्मिथ म्हणाला, ‘ॲडम गिलख्रिस्टच्या बरोबरीला पोहोचण्यासाठी त्याला अजून बराच पल्ला गाठायचा आहे. दोघेही असेच क्रिकेटपटू आहेत, जे कसोटी क्रिकेटमध्ये खालच्या क्रमावर आणि मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये वरच्या क्रमावर फलंदाजी करू शकतात. त्यामुळे त्याच्यात आणि गिलख्रिस्टमध्ये साम्य आहे. आणखी काही वर्षे तो असाच खेळत राहिला तर लोक म्हणतील की गिलख्रिस्ट आणि पंत दोघेही सारखेच आहेत.