IPL 2023 : चेन्नई सुपरकिंग्जला मोठा धक्का, आघाडीचा गोलंदाज ‘या’ कारणामुळे आयपीएलबाहेर

पाठीच्या दुखापतीमुळे हा खेळाडू खेळू शकणार नाही आयपीएल, चेन्नईच्या टीमला धक्का

mukesh choudhary has been ruled out of the IPL
जाणून घ्या कोणता खेळाडू पडला बाहेर? (फोटो सौजन्य-ट्वीटर )

Mukesh Choudhary has been ruled out of the IPL 2023: IPL चा ‘रन’संग्राम सुरू होण्यासाठी अवघा एक दिवस उरलेला आहे. अशातच CSK टीमला म्हणजेच चेन्नई सुपरकिंग्जला मोठा धक्का बसला आहे. वेगवान गोलंदाज मुकेश चौधरी हा दुखापतीमुळे संपूर्ण आयपीएलला मुकणार आहे. दीपक चहर नसताना मुकेश चौधरीने जबरदस्त गोलंदाजी केली होती. मात्र मुकेश चौधरी दुखापत झाल्याने आयपीएलमधून बाहेर गेला आहे. पाठदुखीच्या त्रासामुळे मुकेश चौधरी आयपीएलमधून बाहेर गेला आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार लेफ्टी गोलंदाज मुकेश चौधरीला पाठदुखीचा त्रास होतो आहे. त्यामुळे तो आयपीएल स्पर्धा खेळू शकणार नाही. चेन्नईसाठी हा खूप मोठा धक्का मानला जातो आहे. IPL २०२२ च्या लिलावाच्या वेळी चेन्नई सुपरकिंग्जने मुकेश चौधरीला २० लाखांच्या बेस प्राईजमध्ये खरेदी केलं होतं. २०२२ मध्ये दीपक चहरच्या अनुपस्थितीत मुकेश चौधरीने फास्ट बॉलिंगची धुरा सांभाळली होती.

२०२२ मध्ये २६ वर्षीय मुकेश चौधरीने १३ सामन्यांमध्ये १६ विकेट्स काढल्या होत्या. सुरूवातीच्या षटकात प्रतिस्पर्धी संघातील फलंदाजांना बाद करण्याचे मुकेश चौधरीचं कौशल्य चेन्नईसाठी फायद्याचं ठरलं होतं. डिसेंबर महिन्यापासून मुकेश चौधरीला दुखापत झाली आहे. २ डिसेंबर २०२२ रोजी महाराष्ट्र आणि सौराष्ट्र यांच्यातील सामन्यादरम्यान मुकेश चौधरी याला पाठदुखीचा त्रास झाला होता. अद्याप दुखापतीतून तो सावरलेला नाही.

मराठीतील सर्व आयपीएल २०२३ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 30-03-2023 at 22:03 IST
Next Story
IPL इतिहासात ख्रिस गेलचा झंझावात; १३ चौकार अन् १७ षटकार, ‘त्या’ तीन सामन्यात ठोकले वादळी शतक
Exit mobile version