सलग तिसऱ्या विजयाच्या प्रतिक्षेत असलेल्या राजस्थान रॉयल्सचा पहिला डाव कोलकाता नाइट रायडर्स संघासमोर १६० धावांमध्ये आटोपला आहे. नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतलेल्या कोलकाता नाइट रायडर्सने राजस्थानच्या सलामीवीरांना झटपट बाद करण्याचा प्रयत्न केला. मात्र अजिंक्य रहाणे आणि डार्सी शॉर्ट यांनी पहिल्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी केली. मात्र चोरटी धाव घेण्याच्या नादात अजिंक्य रहाणे माघारी परतला, यानंतर राजस्थानच्या संघातील एकही फलंदाज खेळपट्टीवर टिकाव धरु शकला नाही. अखेर राजस्थानला १६० धावांवर समाधान मानावं लागलं.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

कोलकात्याकडून नितीश राणा आणि टॉम कुरन यांनी प्रत्येकी २-२ बळी घेतले. त्यामुळे राजस्थानने दिलेलं आव्हान कोलकात्याचा संघ कसा पार करतो हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

  • सुनील नरीन धावबाद, कोलकात्याला दुसरा धक्का
  • सुनील नरीन आणि रॉबिन उथप्पा जोडीची दुसऱ्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी
  • कोलकात्याने पार केला ५० धावांचा टप्पा
  • मात्र सुनील नरीन आणि रॉबिन उथप्पाने कोलकात्याचा डाव सावरला
  • कोलकात्याच्या डावाचीही अडखळती सुरुवात, ख्रिस लिन त्रिफळाचीत, कोलकात्याला पहिला धक्का
  • राजस्थानचा डाव १६० धावांवर आटोपला, कोलकात्याला विजयासाठी १६१ धावांचं आव्हान
  • धवल कुलकर्णी अखेरच्या षटकात चोरटी धाव घेताना धावबाद, राजस्थानला आठवा धक्का
  • अखेरच्या षटकांत जोस बटलरची फटकेबाजी
  • लागोपाठच्या चेंडूवर श्रेयस गोपाळ बाद, टॉम कुरनने उडवला गोपाळचा त्रिफळा
  • कृष्णप्पा गौतम माघारी, राजस्थानला सहावा धक्का
  • राजस्थानच्या डावाची घसरगुंडी, निम्मा संघ तंबूत परतला
  • फटकेबाजी करण्याच्या नादात बेन स्टोक्स माघारी
  • राहुल त्रिपाठी माघारी, राजस्थानचा चौथा गडी माघारी
  • राजस्थानने ओलांडला १०० धावसंख्येचा टप्पा
  • नितीश राणाच्या गोलंदाजीवर शॉर्ट माघारी, राजस्थानला तिसरा धक्का
  • डार्सी शॉर्टकडून फटकेबाजी करण्याचा प्रयत्न
  • ठराविक अंतराने राजस्थानला दुसरा धक्का, मोठा फटका खेळण्याच्या नादात संजू सॅमसन माघारी
  • राजस्थानला पहिला धक्का, चोरटी धाव घेण्याच्या नादात रहाणे माघारी
  • दोघांमध्ये पहिल्या विकेटसाठी ५४ धावांची भागीदारी
  • कोलकाताच्या फिरकीपटूंवर अजिंक्यचा हल्लाबोल
  • अजिंक्य रहाणे – डार्सी शॉर्ट जोडीकडून राजस्थानच्या डावाची सावध सुरुवात
  • कोलकात्याने नाणेफेक जिंकली, प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय
मराठीतील सर्व आयपीएल २०१८ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ipl 2018 rr vs kkr live match updates