Virat Kohli broke Chris Gayle and MS Dhoni’s Sixe record : आयपीएलच्या १७व्या हंगामातील १० व्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा सामना कोलकाता नाइट रायडर्सशी झाला. बेंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या सामन्यात केकेआरने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. अशा स्थितीत प्रथम फलंदाजीला आलेल्या आरसीबीचा सलामीवीर विराट कोहलीने येताच वेगाने धावा काढण्यास सुरुवात केली. यादरम्यान त्याने महेंद्रसिंग धोनीचा एक मोठा विक्रमही मोडला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

विराटने धोनी आणि गेलला टाकले मागे –

कोलकात्याविरुद्ध ३ षटकार मारल्यानंतर विराटने आयपीएलमध्ये २४० षटकार पूर्ण केले. यासह त्याने एमएस धोनीला मागे टाकले आहे. धोनीने २५२ आयपीएल सामन्यांच्या २१८ डावांमध्ये २३९ षटकार मारले आहेत. तर विराटने आतापर्यंत आयपीएलच्या २४० सामन्यांच्या २३२ डावांमध्ये २४० गगनचुंबी षटकार मारले आहेत. आयपीएलमध्ये सर्वाधिक षटकार मारणाऱ्या खेळाडूंच्या यादीत आता विराट कोहली चौथ्या स्थानावर पोहोचला आहे. याशिवाय विराट कोहली आरसीबीकडून सर्वाधिक षटकार मारणारा फलंदाज बनला आहे. याआधी हा विक्रम ख्रिस गेलच्या (२३९) नावावर होता.

आरसीबीचे केकेआर १८३ धावांचे लक्ष्य –

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने प्रथम फलंदाजी करताना कोलकाता नाईट रायडर्सला १८३ धावांचे लक्ष्य दिले. आरसीबीसाठी किंग कोहलीने ५९ चेंडूत ८३ धावांची नाबाद खेळी केली. त्याच्या बॅटमधून 4 चौकार आणि ४ षटकार आले. दिनेश कार्तिकने अवघ्या ८चेंडूत तीन षटकारांच्या मदतीने २० धावा केल्या. केकेआरचा मिचेल स्टार्क पुन्हा एकदा चांगलाच महागडा पडला. स्टार्कने चार षटकात एकही विकेट न घेता ४७ धावा दिल्या.

हेही वाचा – पंतप्रधान मोदींची टीम वसूली टायटन्स! महिला क्रिकेटरच्या पोस्टने उडाली खळबळ, ट्रोल होताच मागितली माफी

आरसीबीसाठी सर्वाधिक षटकार मारणारे खेळाडू –

२४१ – विराट कोहली
२३९ – ख्रिस गेल
२३८ – एबी डिव्हिलियर्स
६७ – ग्लेन मॅक्सवेल<br>५० – फाफ डू प्लेसिस

आयपीएलमध्ये सर्वाधिक षटकार मारणारे खेळाडू –

ख्रिस गेल – ३५७ षटकार
रोहित शर्मा – २६१ षटकार
एबी डिव्हिलियर्स – २५१ षटकार
विराट कोहली – २४१ षटकार

मराठीतील सर्व आयपीएल २०२४ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Virat kohli broke chris gayle and mahendra singh dhonis record for most sixes in the match against kkr in ipl 2024 vbm
First published on: 29-03-2024 at 21:20 IST