TATA IPL 2023 Final, CSK vs GT : आयपीएल २०२३ चा फायनलचा सामना रविवारी मुसळधार पावासमुळे रद्द झाला. त्यामुळे चेन्नई सुपर किंग्ज आणि गुजरात टायटन्स यांच्यात होणारा हा सामना आज २९ मे रोजी होणार असल्याचं जाहीर करण्यात आलं. दरम्यान, अमहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये आज पाऊस पडण्याची शक्यता धुसर झाली आहे. त्यामुळे हा सामना पूर्ण २० षटकांचा होण्याची दाट शक्यता आहे. पण सामना राखीव दिवशी होत असल्याने दोन खेळाडूंना याचा खूप आनंद झाला आहे. वीरेंद्र सेहवागने याबाबत प्रतिक्रिया देत म्हटलं आहे की, चेन्नई सुपर किंग्जचा फलंदाज अजिंक्य रहाणे आणि गुजरात टायटन्सच्या साई सुदर्शनला खूप जास्त आनंद झाला आहे. सेहवागने यामागचं कारण सांगितलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

गुजरात टायटन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज दोन्ही संघ फायनल खेळण्यासाठी सज्ज झाले होते. रविवारी हा सामना पाहण्याची चाहत्यांची उत्सुकताही शिगेला पोहोचली होती. परंतु, मैदानात मुसळधार पाऊस कोसळल्याने नाणेफेकही झाली नाही. पावसाची संततधार सतत सुरु होती, त्यामुळे मैदानात पाणी साचलं होतं. शेवटच्या टप्प्यात अंपायर्सने निर्णय घेतला की, अशा परिस्थितीत सामना ५-५ षटकांचाही होणार नाही. सामना रद्द झाल्यामुळे चाहत्यांमध्ये नाराजी पसरली होती.

नक्की वाचा – सामना पाहण्याच्या उत्सुकतेवर ‘पाणी’ फेरलं! रात्र वैऱ्याची होती, पण धोनीच्या चाहत्यांसाठी नाही, स्टेशनवरचा ‘तो’ Video झाला Viral

सामना पूर्णपण रद्द झाल्याने खेळाडूंनाही राखीव दिवशी खेळण्याची संधी मिळाली. सेहवागच्या म्हणण्यानुसार, रविवारी सामना ५-५ षटकांचा झाला असता, तर या खेळाडूंचा रोल राहिला नसता. तसंच कदाचित त्यांना खेळायची संधीही मिळाली नसती. साई सुदर्शन आणि अजिंक्य रहाणे दोन्ही खेळाडू नंबर तीनवर खेळतात. जर पाच षटकांचा सामना झाला असता तर या दोन्ही खेळाडूंना फलंदाजी मिळाली नसती. कारण दोन्ही संघांनी त्यांच्या आक्रमक फलंदाजांना मैदानात उतरवले असते.

मराठीतील सर्व आयपीएल २०२५ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Virender sehwag says ipl 2023 final on reserve day ajinkya rahane and sai sudarshan feels very happy csk vs gt nss