New Zealand Sri Lanka Test Seriesख्राईस्टचर्च : डॅरेल मिचेलचे (१०२) शतक आणि मॅट हेन्रीच्या (७२) अर्धशतकाच्या जोरावर न्यूझीलंडने पहिल्या क्रिकेट कसोटी सामन्याच्या तिसऱ्या दिवशी श्रीलंकेविरुद्ध पहिल्या डावात आघाडी मिळवली. मिचेल व हेन्री यांच्याशिवाय नील वॅगनरने २७ धावांची खेळी केली. त्यामुळे न्यूझीलंडने पहिल्या डावात ३७३ धावसंख्या उभारताना १८ धावांची आघाडी मिळवली. श्रीलंकेने तिसऱ्या दिवसअखेर आपल्या दुसऱ्या डावात ३ बाद ८३ धावा केल्या.
आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Already have a account? Sign in
श्रीलंकेकडे एकूण ६५ धावांची आघाडी आहे. दिवसाचा खेळ संपला तेव्हा अँजेलो मॅथ्यूज (२०) व प्रभात जयसूर्या (२) खेळत होते.न्यूझीलंडने तिसऱ्या दिवसाला ५ बाद १६२ धावसंख्येच्या पुढे खेळण्यास सुरुवात केली. मिचेलला मायकल ब्रेसवेल (२५) व कर्णधार टिम साउदी (२५) यांनी चांगली साथ दिली.
First published on: 12-03-2023 at 00:15 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: New zealand sri lanka test series daryl mitchell century to new zealand amy