२०२० वर्षात जानेवारी महिन्यामध्ये श्रीलंकेचा संघ भारत दौऱ्यावर येणार आहे. BCCI आणि श्रीलंकन क्रिकेट बोर्डाने आज या दौऱ्याची घोषणा केली आहे. या दौऱ्यात दोन्ही संघ ३ टी-२० सामन्यांची मालिका खेळणार आहे. जानेवारी महिन्यात भारतीय संघ झिम्बाब्वेविरुद्ध खेळणार होता, मात्र आयसीसीने झिम्बाब्वे संघावर बंदी घातल्यानंतर बीसीसीआयने श्रीलंकेच्या संघाला आमंत्रण दिलं होतं. श्रीलंकन क्रिकेट बोर्डाने या दौऱ्यासाठी आपला होकार कळवला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

असं असेल श्रीलंकेच्या भारत दौऱ्याचं वेळापत्रक –

  • पहिला टी-२० सामना – ५ जानेवारी – गुवाहटी
  • दुसरा टी-२० सामना – ७ जानेवारी – इंदौर
  • तिसरा टी-२० सामना – १० जानेवारी – पुणे</li>
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sri lankas tour of india 2020 schedule announced psd