गेल्या काही दिवसांमध्ये स्थानिक क्रिकेटमध्ये धडाकेबाज कामगिरी करणाऱ्या मुंबईच्या सूर्यकुमार यादवने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पहिलं पाऊल टाकलं आहे. भारत अ संघाच्या न्यूझीलंड दौऱ्यासाठी सूर्यकुमारची संघात निवड करण्यात आलेली आहे. स्थानिक क्रिकेटमध्ये सूर्यकुमार यादवचा चांगला फॉर्म पाहता, त्याला भारतीय संघात स्थान मिळावं अशी मागणी होत होती. २०२० साली जानेवारी महिन्यात भारत घरच्या मैदानावर श्रीलंका आणि ऑस्ट्रेलियाशी सामने खेळेल, त्यानंतर भारतीय संघ न्यूझीलंड दौऱ्यावर रवाना होईल.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

या दौऱ्यासाठी खेळाडूंना वातावरणाची व खेळपट्ट्यांची सवय व्हावी याकरता भारत अ संघात सूर्यकुमार यादवसह पृथ्वी शॉ, हार्दिक पांड्या आणि इतर खेळाडूंची निवड करण्यात आलेली आहे.

पहिल्या ४ दिवसीय सामन्यासाठी भारत अ संघ पुढीलप्रमाणे –

पृथ्वी शॉ, मयांक अग्रवाल, प्रियांक पांचाल, अभिमन्यू इश्वरन, शुभमन गिल, हनुमा विहारी (कर्णधार), के.एस.भारत (यष्टीरक्षक), शिवम दुबे, शाहबाज नदीम, राहुल चहर, संदीप वारियर, आवेश खान, मोहम्मद सिराज, इशान पोरेल, इशान किशन</p>

दुसऱ्या ४ दिवसीय सामन्यासाठी भारत अ संघ पुढीलप्रमाणे –

पृथ्वी शॉ, मयांक अग्रवाल, प्रियांक पांचाल, शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, वृद्धीमान साहा (यष्टीरक्षक), हनुमा विहारी (कर्णधार), के.एस.भारत (यष्टीरक्षक), शिवम दुबे, रविचंद्रन आश्विन, शाहबाज नदीम, संदीप वारियर, आवेश खान, मोहम्मद सिराज, इशान पोरेल

दौऱ्यातील उर्वरित दोन सामने आणि ३ वन-डे सामन्यांसाठी भारत अ संघ पुढीलप्रमाणे –

पृथ्वी शॉ, मयांक अग्रवाल, ऋतुराज गायकवाड, शुभमन गिल (कर्णधार), सूर्यकुमार यादव, संजू सॅमसन, इशान किशन (यष्टीरक्षक), हार्दिक पांड्या, कृणाल पांड्या, अक्षर पटेल, राहुल चहर, संदीप वारियर, इशान पोरेल, खलिल अहमद, मोहम्मद सिराज

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Suryakumar yadav gets a chance in india a team for new zealand tour pandya brothers also make comeback psd