कर्णधार विराट कोहलीसाठी आयपीएलच्या ११ व्या मोसमाची सुरुवात निराशाजनक झाली असली तरी विराटने एक उत्साह वाढवणारे टि्वट केले आहे. काही वेळा काम धकाधकीचे, कठीण असते पण ज्यावेळी चांगले लोक तुमच्यासोबत असतात तेव्हा आनंद लुटला पाहिजे असे त्याने टि्वटमध्ये म्हटले आहे. या टि्वटसोबत विराटने एक फोटो पोस्ट केला असून त्यामध्ये तो स्वत:, फिरकी गोलंदाज यझुवेंद्र चहल आणि एबी डिव्हिलियर्स दिसत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हे तिघेही आरसीबीमधील त्याचे सहकारी आहेत. आयपीएलच्या पहिल्याच सामन्यात विराटच्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाला दिनेश कार्तिकच्या कोलकाता नाईट रायडर्सकडून पराभवाचा सामना करावा लागला. प्रथम फलंदाजी करताना बंगळुरुने या सामन्यात १७६ धावा केल्या. कोलकताने हे आव्हान आरामात पार केले.

विराटने या सामन्यात ३१ धावा केल्या पण त्याच्या फलंदाजीत तो रुबाब दिसला नाही. ३३ चेंडूत ३१ धावांची खेळी करणाऱ्या विराटने एक चौकार आणि एक षटकार लगावला. पार्ट टाइम फिरकी युवा गोलंदाज नितीश राणाने एका अप्रतिम चेंडूवर त्याला क्लीन बोल्ड केले होते.

मराठीतील सर्व आयपीएल २०१८ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Virat kohli ipl rcb tweet