DIY Summer Health Tips : देशभरात दिवसेंदिवस तापमान वाढतेय. कडक उन्हामुळे रात्रीच्या वेळी लोकांना घराबाहेर पडणे अवघड झालेय आणि उकाड्यामुळे घरात राहणेही कठीण होतेय. एकंदरीत उन्हामुळे लोकांचे जगणे कठीण झाले आहे. अशा परिस्थितीत अनेक राज्यांमध्ये उष्णतेच्या लाटेचा इशारा जारी करण्यात आला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

उन्हाळ्यात डिहायड्रेशन आणि उष्माघाताचा सर्वाधिक धोका असतो. त्यामुळे वारंवार सांगितले जाते की, सूर्यप्रकाशाच्या संपर्कात येणे शक्यतो टाळा. शक्य तितके पाणी प्या, उन्हात बाहेर जाताना डोळ्यावर गॉगल वापरा, चेहरा आणि डोकं झाका. कारण उन्हाळ्यात केवळ उष्णतेमुळे आरोग्य बिघडत नाही, अनेक आजार होण्याचा धोका असतो. पण काही आजार हे आपल्याकडून नकळत होणाऱ्या काही चुकांममुळेही होतात. त्यामुळे उन्हाळ्यात काही चुका करणे आपण स्वत: टाळले पाहिजे.

उन्हाळ्यात आजारी पडण्यामागे नकळत होणाऱ्या कोणत्या चुका कारणीभूत :

१) उन्हातून आल्यानंतर थंड पदार्थांचे सेवन

उन्हाळ्यात थंड पाणी, फ्रिजमधल्या वस्तू किंवा आइस्क्रीम खाण्याचा मोह होतो. पण, उन्हातून आल्यावर लगेच या गोष्टी खाण्याची चूक करू नका. कारण- अतिउष्णतेमुळे शरीराचे तापमान आधीच वाढलेले असते. अशा परिस्थितीत थंड पदार्थ खाल्ल्याने शरीराचे तापमान अचानक बदलू लागते; ज्यामुळे आरोग्य बिघडू शकते.

२) थंड पाण्याची अंघोळ

उन्हातून आल्यानंतर थंड पाण्याने अंघोळ केल्यानंतर खूप बरे वाटते. शरीर थंड आणि ताजेतवाने वाटू लागते. पण, उन्हातून आल्यानंतर लगेच अंघोळ केली, तर तुमचे आरोग्य बिघडू शकते. अशा स्थितीत अंघोळ करण्यापूर्वी शरीर सामान्य तापमानावर येईपर्यंत थंड होऊ द्या. त्यानंतरच अंघोळ करा.

तुम्ही ‘IDIOT’ तर नाही ना? हा अपमान नाही; आजार आहे, काय सांगतात आरोग्य तज्ज्ञ? पाहा लक्षणे आणि उपाय

३) एसी, कूलरसमोर बसणे

उन्हातून परत आल्यानंतर एसी किंवा कूलरच्या थंड हवेसमोर बसणे खूप आरामदायी वाटत असले तरी ही चूक तुम्हाला महागात पडू शकते. तापमानात अचानक झालेल्या बदलामुळे सर्दी, खोकला व अॅलर्जीसारख्या समस्या उदभवू शकतात. अशा स्थितीत उन्हातून आल्यानंतर शरीर सामान्य होईपर्यंत काही काळ पंख्यामध्ये बसून राहणे गरजेचे आहे.

४) जड अन्नपदार्थ खाणे

उन्हाळ्यात जड आणि तळलेले अन्नपदार्थ पचण्यास कठीण असतात. विशेषतः जेव्हा तुम्ही कडक उन्हात वेळ व्यतीत करून परत येता तेव्हा असे पदार्थ खाणे टाळा. त्याऐवजी हलका आणि पौष्टिक आहार घ्या; ज्यामध्ये फळे, भाज्या व दही यांचा समावेश आहे. त्यामुळे तुम्हाला पोट भरल्यासारखे वाटेल आणि पचनक्रियाही चांगली होईल.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Diy summer health care tips 4 things to avoid after returning home from heat in marathi sjr
Show comments