रात्री १० नंतर रेल्वेमध्ये चुकूनही करू नका ‘ही’ कामं; अन्यथा होऊ शकते कारवाई

ट्रेनमध्ये प्रवास करणाऱ्या प्रत्येक प्रवाशाने रेल्वेचे नियम पाळले तर आपला प्रवास अधिक आरामदायी होऊ शकतो.

railway rules
(File Photo : Financial Express)

देशातील बहुतेक लोकांना ट्रेनने प्रवास करायला आवडते. रेल्वे प्रवास आरामदायी तसेच सुरक्षित आहे. अशा परिस्थितीत, तुम्हाला रेल्वेशी संबंधित प्रत्येक नियम माहित असणे आवश्यक आहे. प्रवाशांची सोय लक्षात घेऊन रेल्वेकडून विविध नियम केले जातात. गेल्या काही दिवसांतही रेल्वे बोर्डाने प्रवाशांच्या सोयीसाठी अनेक नियमांमध्ये बदल केले आहे. ट्रेनमध्ये प्रवास करणाऱ्या प्रत्येक प्रवाशाने रेल्वेचे नियम पाळले तर आपला प्रवास अधिक आरामदायी होऊ शकतो. आज आपण रेल्वेशी संबंधित असे काही नियम जाणून घेऊया, ज्याचा संदर्भ देऊन तुम्ही तुमचा प्रवास अधिक आरामदायी करू शकता.

थ्री टायर डब्यातून प्रवास करताना सर्वात जास्त अडचण मधल्या बर्थची होते. अनेकदा खालच्या बर्थचा प्रवासी रात्री उशिरापर्यंत सीटवर बसून राहतो, त्यामुळे मधल्या बर्थवरील प्रवाशाला इच्छा असूनही आराम करता येत नाही. याशिवाय असे देखील घडते की मधल्या बर्थचे प्रवासी रात्री उशिरापर्यंत लोअर बर्थवर बसतात, त्यामुळे खालच्या बर्थवरील प्रवाशाला झोपताना त्रास होतो.

Viral Video : स्कुटी आणि बाईकची झाली टक्कर, नंतर तरुणाने मुलीसोबत जे केले ते पाहून तुम्हालाही येईल राग

तुमच्यासोबतही असे कधी घडले असेल, तर कदाचित तुम्हाला रेल्वेचे नियम माहीत नसावेत. पण यापुढे तुम्ही रेल्वेच्या नियमांचा संदर्भ घेऊ शकता. रेल्वेच्या नियमांनुसार तुम्ही रात्री १० ते सकाळी ६ या वेळेत तुम्ही मधला बर्थ उघडू शकता. म्हणजेच, जर तुमच्याकडे लोअर बर्थ असेल तर रात्री १० नंतर मिडल बर्थ किंवा वरच्या बर्थचा प्रवासी तुमच्या सीटवर बसू शकत नाही. तुम्ही त्याला रेल्वेच्या नियमांचा संदर्भ देऊन त्याच्या सीटवर जाण्यास सांगू शकता. याशिवाय, मधला बर्थ असलेल्या प्रवाशाने दिवसा त्याची सीट उघडली तरी, तुम्ही हा रेल्वे नियम सांगून त्याला नकार देऊ शकता.

ट्रेनमधली टीसी रात्री उशिरा तिकीट तपासण्यासाठी येतात, अशी अनेक प्रवाशांची तक्रार असते. अशा परिस्थितीत त्यांची झोप भंग होते. प्रवाशांचा हा त्रास दूर करण्यासाठी आणि प्रवास सुकर करण्यासाठी रेल्वेच्या नियमानुसार रात्री १० ते सकाळी ६ या वेळेत टीसी प्रवाशांच्या झोपेच्या वेळी तिकीट तपासू शकत नाही. पण जर तुमचा प्रवास रात्री १० नंतर सुरू झाला तर हा रेल्वे नियम लागू होत नाही.

अवघ्या पाच वर्षांच्या मुलीनं बाळाला दिला होता जन्म; घटना वाचून थक्क व्हाल

रात्रीच्या वेळी सहप्रवासी मोबाईलवर मोठ्या आवाजात गाणी ऐकत आहे किंवा व्हिडिओ पाहत आहे, अशा तक्रारी प्रवाशांकडून रेल्वे बोर्डाकडे येतात. या पार्श्वभूमीवर रेल्वेने रात्री १० वाजल्यानंतर इअर फोनशिवाय गाणी ऐकण्यास किंवा व्हिडिओ पाहण्यास बंदी घातली आहे. नियमानुसार रात्री १० नंतर तुम्ही इअर फोनशिवाय गाणी ऐकू किंवा व्हिडिओ पाहू शकत नाही. एवढेच नाही तर रात्री मोठ्याने बोलण्यासही मनाई आहे.

जर तुमचा सहप्रवासी तुमचे ऐकत नसेल तर तुम्ही यासाठी ट्रेनमध्ये उपस्थित असलेल्या रेल्वे कर्मचाऱ्यांकडे तक्रार करू शकता. घटनास्थळी येऊन तुमची समस्या सोडवण्याची जबाबदारी रेल्वे कर्मचाऱ्यांची आहे. त्यानंतरही सहप्रवासी सहमत नसेल, तर त्याच्यावर रेल्वेच्या नियमानुसार कारवाई होऊ शकते.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल ( Lifestyle ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Dont do this things in train after 10 pm otherwise action may be taken pvp

Next Story
Lip Care Tips: ओठ गुलाबी आणि मऊ करा, हे घरगुती उपाय करा
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी