सामान्यतः वजन कमी करण्यासाठी आणि स्वतःला निरोगी ठेवण्यासाठी तेलकट पदार्थांपासून दूर राहण्याचा सल्ला दिला जातो, परंतु या प्रयत्नात लोक अनेकदा देशी तुपापासूनही दूर राहतात. पण असे अजिबात करू नका, कारण देशी तूप आरोग्यासाठी चांगले मानले जाते. फार कमी लोकांना माहित आहे की डाएटिंगसाठी तूप वापरता येऊ शकते. देशी तुपाच्या बाबतीत एक्सपर्ट काय म्हणतात ते जाणून घेऊया.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

देसी तुपाबाबत आरोग्य तज्ञांचे काय मत आहे?

देशातील सुप्रसिद्ध पोषणतज्ञ अवंती देशपांडे यांनी तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर सांगितले की, देसी तूप खाल्ल्याने जेवणाची चव तर वाढतेच पण याचा आरोग्यालाही फायदा होतो. जर तुम्ही सकाळी रिकाम्या पोटी तूप खाल्ले तर तुम्हाला त्याचे आश्चर्यकारक फायदे मिळू शकतात.

सकाळी रिकाम्या पोटी देशी तूप खाण्याचे सहा फायदे

  • रिकाम्या पोटी तूप खाणे त्वचेसाठी फायदेशीर मानले जाते. असे केल्याने चेहऱ्यावर ग्लो येण्यास सुरुवात होते.
  • देशी तूप खाल्ल्याने पचनक्रिया चांगली राहते, त्यामुळे पोटाशी संबंधित कोणतीही समस्या होत नाही.
  • सकाळी उठल्यानंतर रिकाम्या पोटी एक चमचा तूप खाल्ल्यास पोटात चांगले एन्झाईम्स वाढू लागतात.
  • ज्यांना बद्धकोष्ठतेची समस्या आहे त्यांनी सकाळी तूप खावे, त्यामुळे आतड्याची हालचाल सुधारते.
  • देशी तूप भूक नियंत्रित करते आणि वजन कमी करण्यास मदत करते.
  • तूप खाल्ल्याने हाडे मजबूत होतात आणि शरीरात कमजोरी येत नाही.

तुम्हालाही छातीच्या उजव्या बाजूला वेदना जाणवतात का? यामागे असू शकते ‘हे’ कारण

घरच्या घरी तूप तयार करा

जेव्हा आपण बाजारातून तूप विकत घेतो तेव्हा ते खरे आहे की नाही अशी शंका येते, कारण त्यात अनेक वेळा तेल आणि चरबी मिसळलेली असते. अशा परिस्थितीत घरच्या घरी तूप तयार करणे चांगले आहे, जे अतिशय सोपे आहे. यासाठी, दूध उकळताना, त्यात आलेली मलई वेगळी जमा करा आणि फ्रिजमध्ये ठेवा. पुरेसे क्रीम जमा होईपर्यंत हे करत रहा. नंतर एका भांड्यात ही जमा झालेली मलाई काढून गरम करा. थोड्या वेळाने तूप दिसू लागेल, नंतर ते गाळून स्वच्छ डब्यात साठवा.

(येथे देण्यात आलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे.)

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Eat a spoonful of desi ghee on an empty stomach in the morning you will get these miraculous benefits pvp
First published on: 27-06-2022 at 10:49 IST