उच्च यूरिक ऍसिडच्या समस्येशी सामना करत असलेल्या लोकांना नेहमीच चांगले खाण्याचा सल्ला दिला जातो. निरोगी जीवनशैली, संतुलित आहार आणि शारीरिक हालचालींद्वारे युरिक ऍसिड नैसर्गिकरित्या नियंत्रित केले जाऊ शकते. काही पदार्थ असे असतात की त्यात प्युरीनचे प्रमाण जास्त असते. प्युरीन असलेल्या गोष्टी शरीरात पोहोचून यूरिक ऍसिड उत्तेजित करू शकतात, ज्यामुळे गाउट आणि किडनीचा त्रास होतो. गाउट हा एक प्रकारचा संधिवात आहे ज्यामध्ये हात आणि पायांच्या लहान सांध्यांमध्ये तीव्र वेदना होतात.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

WebMD नुसार काही खाद्यपदार्थ आणि पेये तुमच्या शरीरातील यूरिक ऍसिडची पातळी वाढवू शकतात. युरिक अॅसिडची पातळी नियंत्रणात राहिल्यास गाउटच्या समस्येपासून बऱ्याच अंशी आराम मिळू शकतो. विशेषतः मांसाहारी पदार्थ टाळणे फायदेशीर आहे. अशा लोकांना उच्च प्रथिनयुक्त आहारावर नियंत्रण ठेवण्याचा सल्लाही तज्ज्ञ देतात. जास्त प्युरीन आणि जास्त प्रथिनयुक्त आहारामुळे युरिक ऍसिडची समस्या उद्भवू शकते. जास्त यूरिक ऍसिडमुळे होणारी संधिरोग ही समस्या अत्यंत वेदनादायक स्थिती आहे आणि ती कोणत्याही वयोगटातील लोकांना होऊ शकते.

‘या’ ३ गोष्टी युरिक ऍसिडची पातळी वाढवतील..

लाल मांस आणि सीफूड –

ऑर्गन मीट आणि सीफूडमध्ये प्युरीन नावाचे रसायन जास्त प्रमाणात असते. जेव्हा शरीर जास्त प्युरीन प्रक्रिया करून तोडते, तेव्हा तुमच्या शरीरात युरिक ऍसिडची पातळी वाढते. त्यामुळे अशा रुग्णांनी मांसाहाराऐवजी दूध, दही आणि कमी चरबीयुक्त दुग्धजन्य पदार्थांचे सेवन करू शकतात.

साखरयुक्त पेये –

युरिक ऍसिडची पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी सोडा आणि कोल्ड्रिंक्ससारख्या शर्करायुक्त पेयांपासून अंतर राखले पाहिजे. शुगर एडेड ज्यूस आणि उच्च फ्रक्टोज पेये पिल्याने गाउटचा त्रास होऊ शकतो. त्याऐवजी दिवसातून किमान आठ ग्लास पाणी प्या.

(हे ही वाचा: अंडी खाल्ल्याने हार्ट अटॅक, बीपी झपाट्याने कमी होईल? आठवड्यातून किती करावे सेवन जाणून घ्या)

अल्कोहोल –

अल्कोहोल आणि विशेषतः बिअरमुळे गाउट होण्याची शक्यता वाढते. जर तुम्ही युरिक अॅसिडचे रुग्ण असाल तर लवकरात लवकर अल्कोहोलपासून दूर राहा, अन्यथा तुमची समस्या आणखी गंभीर होऊ शकते.

मराठीतील सर्व हेल्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Health red meat seafood sweetened drinks alcohol foods commonly tiggers uric acid gps