नाश्त्याची सवय आणि त्याचा रक्तातील साखरेच्या पातळीवर होणारा परिणाम हा नेहमीच आरोग्य आणि आहाराबाबत सजग असलेल्या लोकांमध्ये चर्चेचा विषय असतो. काही जण गरमागरम भाजलेला ब्रेड आणि अंडे, अशा नाश्त्याद्वारे आपल्या दिवसाची सुरुवात करतात; तर काही जण फक्त अंडे खाण्यास पसंती देतात. पण, प्रश्न असा पडतो की, अंडे खाण्याचा योग्य मार्ग काय आहे? फक्त अंडी खाण्यापेक्षा ब्रेडबरोबर अंडे खाल्ल्यास रक्तातील साखरेवर वेगळा परिणाम होतो का? हे तपासण्यासाठी कटेंट क्रिएटर करण सरीन यांनी दोन्ही प्रकारे अंडे खाऊन पाहिले. ब्रेडबरोबर अंडी खाताना त्यांच्या रक्तातील साखरेची पातळी २० पॉईंटसनी वाढली; जे चिंताजनक नव्हते. परंतु, फक्त अंडी खाल्ल्याने रक्तातील साखरेच्या पातळीत अजिबात वाढ झाली नाही. याबाबतच्या व्हिडीओमध्ये ते म्हणाले, “हेच कारण आहे की, मला अंडी आवडतात. कारण- त्यामध्ये कोणतेही कार्बोहायड्रेट नसतात आणि प्रथिने व इतर पोषक घटकांनी ती समृद्ध असतात.”

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

कंटेंट क्रिएटर सरीन यांच्या या दाव्याबद्दल आणि अंडे ब्रेडबरोबर खाल्ल्यास रक्तातील साखरेवर काय परिणाम होतो हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला. त्याबाबत माहिती देताना लॉर्ड्स मार्क बायोटेकच्या पोषण तज्ज्ञ सांची तिवारी यांनी पुष्टी केली, “फक्त अंडी खाण्याच्या तुलनेत तुम्ही ब्रेडबरोबर अंडे खाल्ल्यास तुमच्या रक्तातील साखरेच्या पातळीमध्ये थोडीशी वाढ होऊ शकते. कारण- ब्रेडमध्ये कार्बोहायड्रेट्स असतात; जे तुमच्या रक्तातील साखरेची पातळी प्रथिनयुक्त अंड्यांपेक्षा वेगाने वाढवू शकतात. म्हणून जर तुम्ही तुमच्या रक्तातील साखरेची पातळी वाढू नये याकडे लक्ष देत असाल, तर तुम्ही तुमच्या अंड्यांबरोबर किती ब्रेड खात आहात यावर लक्ष ठेवावं. पण, प्रत्येकाचं शरीर वेगवेगळ्या प्रकारे प्रतिक्रिया देतं. म्हणून तुमचं शरीर कसं प्रतिसाद देतं हे समजून घेणं आणि त्यानुसार आहारात बदल करणं ही नेहमीच चांगली कल्पना आहे.

ब्रेडमध्ये काही विशिष्ट घटक आहेत का? ते अंड्याच्या ब्रेडबरोबरील सेवनानंतर रक्तातील साखरेच्या पातळीवर परिणाम करतात?

“जेव्हा तुमच्या सकाळच्या दिनचर्येचा विचार केला जातो, तेव्हा तुम्ही अंडे कशाबरोबर खात आहात, त्यानुसार आरोग्याबाबत फरक पडू शकतो. तुम्हाला ब्रेड खायला आवडत असला तरी जेव्हा रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्याचा प्रश्न येतो तेव्हा अंड्याबरोबर ब्रेड खाण्याबाबत तुमची निवड महत्त्वाची ठरते”, असे तिवारी सांगतात.

गव्हापासून बनलेला ब्रेड फायबरयुक्त असतो; जो शरीराला हळूहळू आणि स्थिर उर्जा देतो. त्यामुळे तुमच्या रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहण्यास मदत होते. हे तुमच्या शरीराला हळूवारपणे जागे करण्यासारखे आहे; जे तुम्हाला उरलेल्या दिवसाचा सामना करण्यासाठी तयार करते.

तिवारी सांगतात, “पांढरा ब्रेड तुम्हाला जलद ऊर्जा देऊ शकतो; परंतु त्यामुळे रक्तातील साखरेची पातळी वेगाने वाढू शकते. परिणामत: तुम्हाला नंतर आळस आल्यासा वाटू शकते. हे तुमच्या शरीरासाठी रोलरकोस्टर राईडसारखे आहे. सुरुवातीला चांगले वाटले, तरी दीर्घकाळासाठी ही सवय तितकी चांगली नाही.

“आणि किती प्रमाणात ब्रेड खात आहात याकडे लक्ष द्यायला विसरू नका. ब्रेडच्या बाबतीत मध्यम प्रमाणात सेवन केल्यास तुम्हाला तुमच्या रक्तातील साखरेची पातळी राखण्यासह स्वादिष्ट चवीचा आनंद घेण्याची संधी मिळते”, असेही त्या पुढे म्हणाल्या.

तर, पुढच्या वेळी तुम्ही तुमचा आवडता अंड्याचा नाश्ता तयार कराल, तेव्हा तुम्ही ज्या ब्रेडबरोबर हा नाश्ता घेण्याचा विचार करता. ते किती ब्रेड खायचे याची निवड हुशारीने करा; जेणेकरून तुमच्या शरीराला दिवसभर सतत ऊर्जा आणि चैतन्य मिळेल.

मराठीतील सर्व हेल्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: With or without bread best way to eat eggs to avoid a sugar spike snk