Navratri 2022: २६ सप्टेंबरपासून देशभरात नवरात्री उत्सवाला सुरुवात होणार आहे. आदिशक्तीच्या पूजनाचा हा सोहळा भारतात मोठ्या उत्साहात साजरा होतो. घटस्थापना ते दसऱ्यापर्यंत नऊ शुभ तिथींना विविध रूपातील देवीचे पूजन केले जाते. माया, वात्सल्य व प्रेमाचे प्रतीक असणारी स्त्रीशक्ती ते प्रसंगी रौद्ररूप धारण करणारी कालिका माता या सर्व रूपांच्या पूजनाचा हा सण. घटस्थापनेच्या दिवशी घट बसवून, पुढील नऊ दिवस गरबा – दांडिया खेळून, आरती करून, अखंडज्योती तेवत ठेवून देवीचा जागर केला जातो. नवरात्रीची आणखी एक खास गोष्ट म्हणजे नवरात्रीतील नवरंग.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सहज म्हणून सुरु झालेली एक प्रथा आता ट्रेंड बनली आहे. नवरात्रीच्या प्रत्येक दिवशी एका ठराविक रंगाचे कपडे परिधान केले जातात. यामागे शास्त्र नसले तरी सण साजरी करायची एक सुंदर पद्धत म्हणून याकडे पाहिले जाऊ शकते. शिवाय यातील प्रत्येक रंगाचा आपल्या व्यक्तिमत्वावरही प्रभाव पडतो. यंदा २६ सप्टेंबर ते ५ ऑक्टोबर दरम्यान नवरात्र साजरी होणार आहे. यंदाचे रंग व देवीचे रूप जाणून घेऊयात..

नवरात्री 2022 मधील नवरंग व देवीची नावे

प्रतिपदा पहिला दिवस – 26 सप्टेंबर – पांढरा
देवीचे नाव- शैलपुत्री

द्वितीया दुसरा दिवस – 27 सप्टेंबर- लाल
देवीचे नाव – ब्रह्मचारिणी

तृतीया तिसरा दिवस – 28 सप्टेंबर – रॉयल ब्लू
देवीचे नाव – चंद्रघण्टा

चतुर्थी चौथा दिवस – 29 सप्टेंबर – पिवळा
देवीचे नाव – कुष्माण्डा

पंचमी पाचवा दिवस – 30 सप्टेंबर – हिरवा
देवीचे नाव- स्कंदमाता

षष्ठी सहावा दिवस – 1 ऑक्टोबर – राखाडी
देवीचे नाव – कात्यायिनी

सप्तमी सातवा दिवस – 2 ऑक्टोबर – नारंगी
देवीचे नाव- कालरात्रि

अष्टमी आठवा दिवस – 3 ऑक्टोबर – मोरपिसी
देवीचे नाव- महागौरी

नवमी नववा दिवस – 4 ऑक्टोबर – गुलाबी
देवीचे नाव- सिद्धीदात्री

Navratri 2022: नवरात्रीच्या ९ दिवसासाठी देवीच्या ९ नावांचे खास मंत्र; यंदा ‘या’ रूपात अवतरणार आदिशक्ती

नवरात्रीच्या नऊ दिवसात तुम्हीही हे रंग परिधान करणार असाल तर तुमचे फोटो आमच्यासह आवर्जून शेअर करा.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Navratri 2022 9 colors ghatsthapana tithi muhurt dusshera date 9 devi names and mantra svs
First published on: 25-09-2022 at 20:56 IST