शिंदे सरकारचा नवरात्रोत्सवानिमित्त महत्त्वाचा निर्णय; १ ऑक्टोबरलाही रात्री बारा वाजेपर्यंत मिळणार 'ही' विशेष सूट | Shinde and Fadnavis Government Navratri Loudspeaker rules relaxed for one extra day scsg 91 | Loksatta

शिंदे सरकारचा नवरात्रोत्सवानिमित्त महत्त्वाचा निर्णय; १ ऑक्टोबरलाही रात्री बारा वाजेपर्यंत मिळणार ‘ही’ विशेष सूट

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चर्चेनंतर हा निर्णय घेतला आहे.

शिंदे सरकारचा नवरात्रोत्सवानिमित्त महत्त्वाचा निर्णय; १ ऑक्टोबरलाही रात्री बारा वाजेपर्यंत मिळणार ‘ही’ विशेष सूट
मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या चर्चेनंतर घेण्यात आला निर्णय

यंदाच्या नवरात्रोत्सवात १ ऑक्टोबर या दिवशीही उत्सवासाठी रात्री बारा वाजेपर्यंत ध्वनीक्षेपक व ध्वनीवर्धक वापरास सूट देण्यात येत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चर्चेनंतर हा निर्णय घेतला आहे.

पर्यावरण व वातवरणीय बदल विभागाच्या ध्वनी प्रदूषण (नियमन व नियंत्रण) सुधारित नियम, २०१७ अन्वये वर्षामध्ये एकूण १५ दिवस निश्चित करुन सकाळी ६ वाजल्यापासून ते रात्री १२ वाजेपर्यंत ध्वनीक्षेपक व ध्वनीवर्धक वापरास सूट जाहीर करण्यासाठी संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना प्राधिकृत करण्यात आले आहे. सर्वसाधारणपणे संबंधित जिल्हाधिकारी यांचेकडून १३ दिवस निश्चित करण्यात येतात. तसेच, २ दिवस हे जिल्ह्यातील स्थानिक परिस्थितीनुसार सूट देण्यासाठी राखीव ठेवण्यात येतात.

यावर्षी नवरात्रोत्सव उत्साहात साजरा करता यावा यासाठी १ ऑक्टोबर, २०२२ रोजी नवरात्रोत्सवासाठी सकाळी सहा ते रात्री बारा वाजेपर्यंत ध्वनीक्षेपक व ध्वनीवर्धक वापरास सूट देण्यात आली आहे. त्यामुळे मुंबईमध्ये यंदाच्या नवरात्रोत्सवासाठी ३ आणि ४ ऑक्टोबरबरोबरच आता १ ऑक्टोबरचा अधिकचा दिवसही मिळणार आहे.

मराठीतील सर्व लोक उत्सव ( Lokutsav ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
Navratri 2022 : माजी पालकमंत्री आदिती तटकरे यांचा गरबा डान्स; पाहा Viral Video

संबंधित बातम्या

Video: जेव्हा मुख्यमंत्रीच विसरतात आपण मुख्यमंत्री आहोत! भाषणाच्या सुरुवातीलाच एकनाथ शिंदे फडणवीसांबद्दल काय म्हणाले ऐकलं का?
“बल्बचा शोध कधी लागला? मराठी माणसाला येड्यात…”, जितेंद्र आव्हाडांचं खोचक ट्वीट; ‘वेडात मराठे..’ चित्रपटावरून टोला!
Maharashtra Breaking News Live : सीमाप्रश्नावरून राज ठाकरेंनी कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना सुनावलं; वाचा महाराष्ट्रातील महत्त्वाच्या घडामोडी, एका क्लिकवर!
Maharashtra Karnataka Dispute : ‘कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी आता जरा तोंडास आवर घालावा आणि…’ राज ठाकरेंचा सूचक इशारा!
“तोंड आवरा, पुन्हा आरामाची वेळ येऊ नये” देसाईंच्या इशाऱ्यानंतर राऊतांचे सडेतोड प्रत्युत्तर; म्हणाले, “महाराष्ट्राची बाजू लढणारे…”

व्हिडिओ

ताज्या बातम्या
“मी सुशांत सिंहकडून…” सारा अली खानने जागवल्या ‘केदारनाथ’च्या आठवणी
पिंपरीः चिंचवड गोळीबार प्रकरणात तीन आरोपी अटकेत
दिल्ली महापालिकेत विजय; ‘आप’कार्यकर्त्यांचा कोल्हापुरात जल्लोष
पिंपरी-चिंचवडमध्ये उद्या बंद ;आंदोलनात छत्रपती संभाजीराजेचा सहभाग
पिंपरी पोलिसांचा दरारा! तीन ठिकाणी हवेत गोळीबार करणाऱ्या आरोपींना काही तासांतच पोलिसांनी ठोकल्या बेड्या