मुंबई : सरकारी कर्मचाऱ्यांचे वेतन व निवृत्ती वेतन आणि व्याज फेडण्यासाठी एकूण महसुली जमेच्या ५८.४६ टक्के खर्च अपेक्षित धरण्यात आला आहे. चालू आर्थिक वर्षांत हा खर्च मूळ तरतुदीत पाच टक्के वाढून ६४ टक्क्यांवर गेला आहे. महसुली जमा ४ लाख ४९ हजार ५२३ कोटी तर खर्च ४ लाख, ६५ हजार, ६४५ कोटी रुपये दाखविण्यात आला आहे. महसुली जमेच्या १ लाख ४४ हजार कोटी (३२.२१ टक्के), निवृत्ती वेतन ६७,३८४ कोटी (१४.९९ टक्के), तर व्याज फेडण्याकरिता ५०,६४८ कोटी (११.२६ टक्के) खर्च होणार आहे. हा सारा खर्च २ लाख ६२ हजार, ८०३ कोटी रुपये एवढा आहे. एकूण खर्चाच्या ५८.४६ टक्के रक्कम वेतन, निवृत्ती वेतन आणि व्याज फेडण्यावर खर्च होणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

चालू आर्थिक वर्षांत (२०२२-२३) वेतन, निवृत्ती वेतन आणि व्याज फेडण्यावर ५९ टक्के खर्च दाखविण्यात आला होता. प्रत्यक्षात सुधारित अर्थसंकल्पात हा खर्च ६४.३५ टक्क्यांवर गेला आहे. वेतन, निवृत्ती वेतनासह व्याज फेडण्यावरील खर्च ५० टक्क्यांच्या आसपास असावा, असा प्रयत्न असतो. पण यंदा हा खर्च ६४ टक्क्यांवर गेला आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 58 percent expenditure on government employees wages pensions and interest amy
First published on: 10-03-2023 at 03:27 IST