मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या पत्नी रश्मी ठाकरेंच्या नावे कोर्लई गावात १९ बंगले नावावर असून या व्यवहारासंबंधी आरोप केल्यानंतर किरीट सोमय्यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आरोप सिद्ध करण्याचं आवाहन दिल्यानंतर किरीट सोमय्या यांनी आज कोर्लई गाव गाठले. तर सोमय्या हे ग्रामपंचायत कार्यालयाजवळ पोहचताच शिवसेना कार्यकर्ते आक्रमक झाले आणि यानंतर, भाजपा व शिवसेना कार्यकर्ते आमनेसामने आले होते. दोन्ही बाजुंनी मोठी घोषणाबाजी झाली. ग्रामपंचायत परिसरात मोठ्याप्रमाणावर पोलीस दाखल झाले होते. यामुळे गावातही तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

किरीट सोमय्या यांनी मुरुड तालुक्यातील कोर्लई गावात रश्मी ठाकरे आणि मनिषा वायकर यांच्या जागेवर असलेले १९ बंगले गेले कुठे गायब झाले? याची चौकशी करा अशी मागणी केली आहे., कोर्लई ग्रामपंचायतीला भेट दिल्यानंतर त्यांनी रेवदंडा पोलीस ठाण्यात जाऊन यासंदर्भात तक्रार अर्ज दाखल केला आहे.

  “ग्रामपंचायतीने दिलेल्या माहितीनुसार त्या ठिकाणी बंगले होते. आता जर ते तिथे नसतील तर ही गंभीर बाब आहे. ते बंगले गेले कुठे? याची चौकशी व्हायला हवी अशी मागणी त्यांनी यावेळी केली. मुख्यमंत्री खरे की रश्मी ठाकरे खऱ्या आहेत याची स्पष्टता व्हायला पाहीजे. रश्मी उध्दव ठाकरे यांना न्याय मिळवून द्यायचा आहे. त्यामुळे आम्ही त्यांच्या सोबत आहोत. पाच कोटी रुपयांची मालमत्ता त्यांना परत मिळवून द्यायची आहे.”, असा टोला देखील त्यांनी यावेळी लगावला.

तसेच, भेटी दरम्यान प्रशासनाने सहकार्य केले, दोन दिवसांत आवश्यक माहीती देण्याचे आश्वासन प्रशासनाने दिल्याचे सोमय्या यांनी या भेटीनंतर माध्यमांशी बोलतांना स्पष्ट केले आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: As soon as kirit somaiya came to korlai village shiv sena bjp workers came face to face msr