महागाईने सामान्य नागरिकांचे कंबरडं मोडलं आहे. त्यामुळे अंत्योदय आणि केशरी कार्डधारकांना ही दिवाळी गोड करता यावी, यासाठी रेशन दुकानांतून शंभर रुपयांत रवा, साखर, तेल, चणाडाळीचे किट देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता. मात्र, ‘आनंदाचा शिधा’वरून शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव यांनी शिंदे-भाजपा सरकारवर हल्लाबोल केला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

“परतीच्या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतला आहे. काही लोकांचं पिक वाचलं असेल, पण पाण्यामुळे ते कुजून जात आहे. अशावेळी सरकारने आनंदाचा शिधा देण्याचा मोठा गाजावाज केला. पाठ थोपटून घेत शिध्यावर स्वत:चे फोटो छापले,” अशा शब्दांत भास्कर जाधव यांना मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांवर टीका केली आहे.

हेही वाचा : “शिंदे साहेब तर फक्त डिलीव्हरी बॉय निघाले, शिवसेनेतून…”, राष्ट्रवादीच्या नेत्याचा मुख्यमंत्र्यांना टोला!

“त्यांच्या जखमेवर मीठ…”

“लोकांना १०० रुपयांत आनंदाचा शिधा दिला. १०० रुपयांत दिवाळी साजरी होते का? यामुळे शेतकरी दुखावला आहे. १०० रुपयांची दिवाळी भेट देऊन त्यांच्या दुखावर मीठ चोळलं आहे. त्यातही काही मंत्री स्वत: शिधा वाटप करत होते. पण, शिधा वाटप हे दिवाळी सण करणाऱ्यांची कुचेष्टाच आहे,” असेही भास्कर जाधव यांनी म्हटलं.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bhaskar jadhav attacks on cm eknath shinde and devendra fadnavis over anandacha shidha ssa