बाळासाहेब थोरात यांच्या राजीनाम्याच्या चर्चेवरून भाजपाची पटोलेंवर खोचक टीका; म्हणाले, “बुडत्याला काठीचाही…”,

नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीतील उमेदवारीवरून काँग्रेसमध्ये अंतर्गत संघर्ष निर्माण झाला आहे.

Balasaheb Thorat resignation speculations
लोकसत्ता ग्राफीक्स टीम

नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीतील उमेदवारीवरून काँग्रेसमध्ये अंतर्गत संघर्ष निर्माण झाला आहे. अशातच काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी विधिमंडळ पक्षनेतेपदाचा राजीनामा दिल्याची चर्चा रंगू लागली आहे. दरम्यान, यावरून भाजपा नेते केशव उपाध्ये यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर खोचक शब्दात टीका केली आहे. पटोले यांनी आधी काँग्रेस वाचवावी त्यानंतर इतर गप्पा माराव्या, असे ते म्हणाले. ट्वीट करत त्यांनी यासंदर्भात प्रतिक्रिया दिली.

हेही वाचा – “याचे परिणाम भोगावे लागतील”, आव्हाडांनी शिवरायांबाबत केलेल्या विधानानंतर संभाजीराजे आक्रमक; म्हणाले, “एका विशिष्ट कंपूत…”

काय म्हणाले केशव उपाध्ये?

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी विधिमंडळ पक्षनेतेपदाचा राजीनामा दिल्याची चर्चा सुरू असताना भाजपाचे नेते केशव उपाध्ये यांनी ट्वीट करत नाना पटोले यांना लक्ष्य केलं आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात
यांच्या राजीनाम्याने काँग्रेसमधील अंतर्गत नाराजी स्पष्ट दाखवून दिली आहे. नाना पटोले यांनी आता तरी डोळे उघडावे. आधी काँग्रेस वाचवावी त्यानंतर इतर गप्पा माराव्या. असे ते म्हणाले.

नाना पटोलेंकडून स्पष्टीकरण

दरम्यान, याबाबत आमच्याकडे बाळासाहेब थोरातांचा राजीनामा आला नसल्याची प्रतिक्रिया काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिली आहे. आमच्याकडे बाळासाहेब थोरातांचा कोणताही राजीनामा आलेला नाही. माध्यमं काँग्रेसबाबत फार चिंता करत आहेत. याबाबत आम्ही १५ फेब्रुवारीरोजी कार्यकारणी बैठक आयोजित केली आहे. या बैठकीत पक्षातील घडामोडींवर चर्चा केली जाईल, असं ते म्हणाले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 07-02-2023 at 14:16 IST
Next Story
बाळासाहेब थोरातांच्या राजीनाम्यानंतर अशोक चव्हाण ॲक्शन मोडमध्ये, मनधरणी करण्याचा प्रयत्न करणार; म्हणाले, “थोरात पक्ष सोडून…”
Exit mobile version