जेव्हा नारायण राणे यांनी शिवसेना सोडली तेव्हा त्यांना संपवण्यासाठी उद्धव ठाकरेंनी सुपारी दिली असल्याचा खळबळजनक आरोप भाजपा आमदार नितेश राणे यांनी केला आहे. ट्वीट करत राणेंनी हा गंभीर आरोप केला आहे. याअगोदरही उद्वव ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना झेड प्लस सुरक्षा नाकारल्याचा आरोप बंडखोर आमदार सुहास कांदेंनी केला होता.
हेही वाचा- “…तर शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी होऊ”; अमित ठाकरेंचं मोठं विधान
“माझ्या वडिलांनी जेव्हा शिवसेना सोडली, तेव्हा एकनाथ शिंदेप्रमाणेच त्यांनाही मारण्यासाठी तथाकथित शांत आणि संयमी पक्षप्रमुखांकडून सुपाऱ्या देण्यात आल्या. हे ‘म्याव म्याव’ आता संपवून टाकूया आणि आपण व्याजासह वस्त्रहरण सुरु करु,” असे ट्वीट नितेश राणे यांनी केले आहे.
सुहास कादेंच्या आरोपावर दिलीप वळसे पाटलांचे स्पष्टीकरण
महाविकास आघाडी सरकार काळात एकनाथ शिंदेंना नक्षलवाद्यांकडून जीवे मारण्याची धमकी मिळाली होती. मात्र, त्यानंतरही तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी शिंदेना झेड प्लस सुरक्षा देण्याचं नाकारलं असल्याचा दावा बंडखोर आमदार सुहास कांदेंनी केला आहे. तर बंडखोर आमदारांकडून करण्यात आलेल्या या आरोपात तथ्य नसून एकनाथ शिंदेंना झेड प्लस सुरक्षा पुरवण्यात आली होती. उद्धव ठाकरेंनी शिंदेंना झेड प्लस सुरक्षा देऊ नका, अशा कोणत्याही सूचना दिली नसल्याचे स्पष्टीकरण माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिलं आहे.