रत्नागिरी : उत्तर रत्नागिरीचे जिल्हाप्रमुख संजय वसंत कदम यांनी पक्षविरोधी कारवाया केल्याचा ठपका ठेवत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने शिवसेना पक्षातून पक्ष विरोधी कारवाया केल्याने हकालपट्टी करण्यात आली आहे.
शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख संजय कदम शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरु झाली होती. याला त्यांच्याकडून अधिकृत दुजोरा आला नसला तरीही ते शिंदे शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचे निश्चित मानले जात आहे. या पक्ष प्रवेशासाठी कट्टर विरोधक रामदास कदम यांच्या बरोबर हातमिळवणी करत भेत घेतली होती.
संजय कदम शिन्देच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची चर्चा असताना ठाकरे पक्षात राहून पक्षविरोधी कारवाया केल्याचे निदर्शनास आल्याने त्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. शिवसेना पक्षाचे प्रमुख उध्दव ठाकरे यांच्या आदेशाने ठाकरे शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धीस देण्यात आलेल्या पत्रकाद्वारे याची माहिती देण्यात आली आहे.
© The Indian Express (P) Ltd