हिंगोली जिल्ह्यात आज (१० जुलै) सकाळी ६ वाजताच्या सुमारास ४.५ रिश्टर स्केलचा भूकंपाचा धक्का बसल्याची माहिती समोर आली आहे. हिंगोली जिल्ह्यातील भूकंपाचे हादरे हे नांदेड आणि परभणी जिल्ह्यात काही ठिकाणी जाणवले असल्याची माहिती समोर येत आहे. दरम्यान, राष्ट्रीय भुकंपशास्त्र केंद्राकडूनही यासंदर्भातील माहिती देण्यात आली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

या भूकंपाच्या धक्क्यांमुळे कोणतीही जीवितहानी झालेली नाही. फक्त हिंगोली जिल्ह्यातील काही भागात भूकंपाचे सौम्य दोन धक्के जाणवले आहेत, अशी माहिती स्थानिक सांगत आहेत. हिंगोली जिल्ह्यात भूकंपाचे सौम्य धक्के जाणवल्यानंतर काही व्हिडीओ व्हायरल होत आहेत. यामध्ये एक व्हिडीओ समोर आला असून त्यामध्ये एका घरातील भिंतीवरील फॅन हलताना दिसत आहे.

हेही वाचा : सोलापूर जिल्ह्यातील दुष्काळी २.४२ लाख वंचित शेतकऱ्यांना अनुदान मिळणार, दुष्काळी विद्यार्थ्यांनाही शुल्कमाफी

भूकंपाच्या धक्क्यांमुळे नागरिकांमध्ये काहीसे भीतीचे वातावरण निर्माण आहे. या भूकंपाचे केंद्रबिंदू हिंगोली जिल्ह्यात बाळापूर परिसर असल्याची माहिती सांगितली जात आहे. दरम्यान, या भूकंपाच्या धक्क्यांमुळे सुदैवाने कोणतीही जीवितहानी किंवा वित्तहानी झालेली नाही. या भूकंपाच्या धक्क्यासंदर्भात अद्याप प्रशासनाकडून अधिकृत प्रतिक्रिया समोर आलेली नाही.

राष्ट्रीय भुकंपशास्त्र केंद्राने दिलेल्या माहितीनुसार, हिंगोली जिल्ह्यातील भूकंपाची तीव्रत ही ४.५ रिश्टर स्केल एवढी होती. बुधवारी सकाळी ६ वाजताच्या सुमारास भूकंपाचे धक्के जाणवले. दरम्यान, या परिसरात भीतीचे वातावरण पसरली आहे. मात्र, घाबरुन न जाण्याचं आवाहन करण्यात येत आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Earthquake news mild earthquake tremors in hingoli district and marathwada nanded parbhani gkt