पतीने पत्नीचा गळा दाबून खून करून स्वतः राहत्या घरात  गळफास घेऊन आत्महत्या केल्याची  घटना माढा तालुक्यातील व्होळे (खुर्द) या गावात घडली. या गुन्ह्याची टेंभुर्णी पोलीस ठाण्यात नोंद झाली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>> सोलापूर: नणंदेचा मुलगा दत्तक घेण्यासाठी छळ; विवाहितेची आत्महत्या

सोनाली प्रशांत ओहोळ (वय २६) असे खून झालेल्या विवाहितेचे नाव असून तर आत्महत्या केलेल्या पतीचे नाव प्रशांत महादेव ओहोळ (वय ३४) असे आहे. हा धक्कादायक प्रकार प्रशांतची सासरवाडीत म्हणजे सोनालीच्या माहेरी घडला.  याबाबत मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार प्रशांत याने पत्नी सोनाली हिचा गळा दाबून खून केला. यानंतर त्याने घरातच गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना  सकाळी उघडकीस येताचा टेंभुर्णी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दीपक पाटील यांनी घटनास्थळी धाव घेतली.

हेही वाचा >>> धक्कादायक! मद्यपि चालकामुळे कंडक्टरवर बस चालण्याची वेळ

प्रशांत ओहोळ हा मूळचा मोडनिंब (ता. माढा) येथील रहिवाशी असून वडिलांशी भांडण झाल्याने तो काही महिन्यापासून व्होळे येथे सासरवाडीत राहात होता. दरम्यान, पत्नीचा खून करण्याचे व स्वतः आत्महत्या करण्याचे कारण अद्याप समोर आले नसून पोलीस पुढील तपास करीत आहेत.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Man killed wife by strangulation and committed suicide by hanging himself zws