उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामतीध्ये बोलताना पवार कुटुंबावर भाष्य केले होते. तसेच विकासकामांवर बोलताना आम्ही फक्त सेल्फी काढत फिरत नाही, असा टोलाही खासदार सुप्रिया सुळे यांना लगावला होता. त्यावरच आता खुद्द सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली. देशाचे पंतप्रधान सेल्फी काढण्यास प्रोत्साहित करतात. मोदीदेखील खासदारांना सेल्फी काढा, असे सांगतात, असे प्रत्युत्तर सुप्रिया सुळे यांनी दिले. त्या माध्यम प्रतिनिधींनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देत होत्या.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सुप्रिया सुळेंचे अजित पवारांना उत्तर

“प्रत्येक कॉलेजमध्ये मोदींचा एक फोटो लावा, त्या फोटोसोबत एक सेल्फी काढा असा आदेश काढण्यास सांगितले होते. रेल्वेस्थानकापासून ते महाविद्यालयांपर्यंत मोदींच्या फोटोचे सेल्फीपॉइंट्स लावा, असाही आदेश देण्यात आला होता. देशाचे पंतप्रधानच आम्हाला जा आणि सेल्फी काढा असे आवर्जुन सांगतात. या देशाचे पंतप्रधान हे वयाने मोठे आहेत, ज्येष्ठ आहेत. त्यांच्या विचाराचा आम्ही मान सन्मान करतो,” असे प्रत्युत्तर सुप्रिया सुळे यांनी दिले.

अजित पवार काय म्हणाले होते?

“परदेशी, परराज्यातील गुंतवणूक होण्यासाठी ज्या पायाभूत सुविधा लागतात त्या दौडं, पुरंदर, मुळशी या भागात निर्माण करायच्या आहेत. तेवढी क्षमता आपल्यात आहे. तेवढा आपला आवका आहे. आपण फक्त वरवर राजकारण करत नाही. आपण फक्त सेल्फी काढत फिरत नाही. आपण काम करुनच दाखवतो,” अशी खोचक टीका अजित पवार यांनी सुप्रिया सुळेंचे नाव न घेता केली होती.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mp supriya sule criticizes ajit pawar comment over selfie prd