रत्नागिरी : कोकण रेल्वे मार्गावरील आडवली येथे ओहरहेड वायर तुटल्याने कोकण रेल्वे मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली असून यामार्गावरील अनेक गाड्यांना याचा फटका बसला. या तांत्रिक अडचणीमुळे मोठ्या प्रमाणावर रेल्वे प्रवाशी ठीकठिकाणी रेल्वे स्थानकांमध्ये अडकून पडले. रेल्वे वाहतुक सुरळीत करण्यासाठी कोकण रेल्वे प्रशासन शर्तीचे प्रयत्न करीत आहे.
कोकण रेल्वे मार्गावरील आडवली येथे ओहरहेड वायर तुटल्याने कोकण रेल्वे मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली असून अनेक गाड्या दोन ते तीन तासांपेक्षा अधिक काळ काही रेल्वे स्थानकावर अडकून पडलेल्या आहेत.
मुंबई मडगाव मांडवी एक्स्प्रेस संगमेश्वर येथे दोन तासापासुन उभी करण्यात आली आहे. तर मडगाव मुंबई मांडवी एक्स्प्रेस रेल्वे गाडी वैभववाडी येथे दीड तासांपासून थांबवून ठेवण्यात आली आहे. मुंबई मडगाव तेजस एक्स्प्रेस रेल्वे गाडी दोन तासांपासून रत्नागिरी रेल्वे स्थानकात उभी करण्यात आली आहे. तसेच जनशताब्दी एक्सप्रेस ही गाडी अडीच तासांपासून आडवली येथे थांबवून ठेवण्यात आली आहे. पुढील दोन ते तीन तासात वाहतूक पुर्वत होईल असे कोकण रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी सचिन देसाई यांनी सांगितले आहे. वायर जोडण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू करण्यात आले आहे. मात्र या तांत्रिक अडचणीचा मोठा फटका रेल्वे प्रवाश्यांना बसला आहे.
© The Indian Express (P) Ltd