टेंभी नाक्यावर देवीचे दर्शन घेतल्यानंतर रश्मी ठाकरे थेट संजय राऊतांच्या निवासस्थानी | rashmi thackeray meets sanjay raut family man navratri | Loksatta

टेंभी नाक्यावर देवीचे दर्शन घेतल्यानंतर रश्मी ठाकरे थेट संजय राऊतांच्या निवासस्थानी

टेंभी नाक्यावरील नवरात्रोत्सवात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांनी देवीचे दर्शन घेतले.

टेंभी नाक्यावर देवीचे दर्शन घेतल्यानंतर रश्मी ठाकरे थेट संजय राऊतांच्या निवासस्थानी
रश्मी ठाकरे आणि संजय राऊत

शिवसेनेचे दिवंगत ठाणे जिल्हाप्रमुख आनंद दिघे यांनी सुरू केलेल्या टेंभी नाक्यावरील नवरात्रोत्सवात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांनी देवीचे दर्शन घेतले. रशी ठाकरे यांनी आनंद आश्रमात जाऊन आनंद दिघे यांच्या प्रतिमेचेही दर्शन घेतले. शिवसेनेतील बंडानंतर रश्मी ठाकरे यांनी प्रथमच सार्वजनिक कार्यक्रमाला हजेरी लावली. त्यामुळे रश्मी ठाकरेंच्या या कृतीचे अनेक राजकीय अर्थ लावले जात आहेत. नवरात्रोत्सवातील सहभागासोबतच आज (२९ सप्टेंबर) रश्मी ठाकरे यांनी सध्या कोठडीत असलेले शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. या भेटीसाठी त्या थेट राऊत यांच्या निवासस्थानी गेल्या.

हेही वाचा >>> “भाजपाकडून पंकजा मुंडेंचे महत्त्व कमी करण्याचा प्रयत्न”, मुंडेंच्या ‘बेरोजगार’ विधानावर जयंत पाटलांची प्रतिक्रिया

रश्मी ठाकरे यांनी संजय राऊत यांच्या भांडुप येथील मैत्री या निवासस्थानी जात राऊत यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. राऊत यांच्या कुटुंबीयांसोबत त्यांनी नवरात्रोत्सव साजरा केला. संजय राऊत यांच्यावर अटकेची कारवाई झाल्यानंतर पहिल्यांदाच रश्मी ठाकरे या त्यांच्या घरी दाखल झाल्या. याच कारणामुळे रश्मी ठाकरेंच्या या भेटीला विशेष महत्त्व आले आहे. संजय राऊत हे सध्या कारागृहात असताना अशा कठीण प्रसंगात ठाकरे कुटुंबीय राऊत यांच्या सोबत असल्याचा विश्वास त्यांनी यावेळी त्यांच्या कुटुंबीयांना दिला.

हेही वाचा >>> बाळासाहेबांचा आवाज, हिंदवी तोफ अन्…; CM शिंदेंनी शेअर केला स्वत:चा ‘एकलव्य’ असा उल्लेख ‘शिवसेना दसरा मेळाव्याचा’ टीझर

याआधी शिवसेनेचे दिवंगत ठाणे जिल्हा प्रमुख आनंद दिघे यांनी सुरु केलेल्या टेंभी नाक्यावरील नवरात्रोत्सवात रश्मी ठाकरे यांनी उपस्थिती लावत महाआरती केली. यानिमित्ताने ठाकरे गटाकडून उत्सवाच्या परिसरात मोठे शक्तीप्रदर्शन करण्यात आले. तसेच महाआरतीनंतर ठाकरे गटाकडून देवीच्या मंडपातच जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. दरम्यान, या उत्सवाला उपस्थिती लावण्याआधी रश्मी ठाकरे यांनी टेंभीनाक्यावरील आनंद आश्रमात जाऊन आनंद दिघे यांच्या प्रतिमेचे दर्शन घेतले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
राज्यात ढगांच्या गडगडाटासह पाऊस ; मध्य महाराष्ट्र, कोकण, मराठवाड्यात शक्यता

संबंधित बातम्या

राज्यपालांबाबत आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचा उदयनराजेंना सल्ला; म्हणाले, “महाराष्ट्रात व साताऱ्यात दंगा करून आंदोलन करण्यापेक्षा…”
मुंबई: कुर्ल्यामध्ये महिलेवर सामूहिक बलात्कार; तिघांविरोधात गुन्हा दाखल
Maharashtra-Karnataka Border Dispute : “मंत्र्यांनी ठरवलं तर त्यांना जाण्यापासून कोणी रोखूही शकत नाही, परंतु…”; फडणवीसांच विधान!
“ज्यांनी महापरिनिर्वाण दिनाला कधी बॅनर लावले नाहीत, ते…”; वंचित-ठाकरे गट बैठकीवरून दिपक केसरकरांची खोचक टीका
हैद्राबादच्या निझामांच्या महाबळेश्वर येथील २५० कोटींच्या संपत्तीवर सातारा जिल्हाधिकाऱ्यांची धडक कारवाई

व्हिडिओ

ताज्या बातम्या
महाराष्ट्र तोडण्याचा हेतूपुरस्सर प्रयत्न होतोय; उद्धव ठाकरेंचा नाव न घेता भाजपावर हल्ला
Video : राणादाने केला सरप्राईज डान्स, पाठकबाईंनी पाहताच क्षणी जोडले हात
पांढरे केस, मिशी अन् थकलेला चेहरा, अविनाश नारकरांना तुम्ही ओळखलं का? लग्नाला २७ वर्ष पूर्ण होताच म्हणाले…
तूपाचे सेवन ‘या’ ५ आजारांमध्ये ठरते विषासमान; तज्ज्ञांकडून जाणून घ्या तूप कोणी खावे आणि कोणी नाही
विश्लेषण : आपल्या देशात किती प्रकारच्या बँका आहेत? त्यांचे काम कसे चालते?