एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेतील ४० आमदारांच्या बंडखोरीनंतर राज्यात सत्तांतर झाले. बंडखोरीनंतर सध्या राज्यात शिंदे गट-भाजपा संयुक्तपणे सत्ताशकट हाकत आहेत. या बंडखोरीदरम्यान शिवसेनेतील ४० आमदारांनी सुरत, गुवाहाटी नंतर महाराष्ट्र असा प्रवास केला. या काळात शिवसेनेतील बंडखोरीप्रमाणेच आमदारांच्या या परराज्यातील प्रवासाचीही चांगलीच चर्चा झाली. दरम्यान, शिंदे गटातील आमदार संजय शिरसाट यांनी या प्रवासावर भाष्य केले आहे. आम्ही पावसात सुरतला गेलो होतो. मी कधी शर्टवर फिरत नाही. मात्र तेथे मी टी शर्टवर दिसायचो, असे संजय शिरसाट म्हणाले. ते एका कार्यक्रमात बोलत होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >> “…तर खपवून घेतले जाणार नाही,” टक्केवारीचा उल्लेख करत फडणवीसांनी घेतली स्पष्ट भूमिका; म्हणाले “दोन वर्षांत…”

मी विधानसभेत १३ वर्षांपासून आहे. या काळात मी अनेक मुख्यमंत्र्यांना पाहिले आहे. त्यांच्या कामाची पद्धत पाहिली आहे. मात्र सत्ता आल्यानंतर मागील अडीच वर्षात कसे काम कसे करावे, हे आम्हालाच समजत नव्हते, असे संजय शिरसाट म्हणाले.

हेही वाचा >> Congress President Election: अर्ज दाखल करताच शशी थरुर यांचं मोठं विधान, म्हणाले “काँग्रेसमधील हायकमांड संस्कृती…”

आम्ही जेव्हा सुरतला गेलो, तेव्हा एका गाडीत संदीपान भुमरे, अब्दुल सत्तार होते तर दुसऱ्या गाडीत प्रदीप जैस्वाल आणि मी होतो. सुरतला रात्रीच्या पावसात गेलो. तो काळा आठवला की तो वेळ काय होती काळ काय होता असे वाटते. सुरत आणि गुवाहाटीचा इतिहास तुम्हाला माहिती आहे. मी कधी शर्टवर फिरत नाही. पण तिकडे दिवसभरात कोणालातरी टी शर्टवर दिसायचो, असे संजय शिरसाट मिश्किलपणे म्हणाले.

हेही वाचा >> शिंदे गटाकडून युवासेनेची कार्यकारिणी जाहीर; राज्यभरात नेमले नवे पदाधिकारी

दरम्यान, राज्यात सत्तांतर झाल्यानंतर संजय शिरसाट यांनी मंत्रिपद मिळावे म्हणून अनेक प्रयत्न केले. या काळात त्यांनी मोठा शक्तिप्रदर्शनही केले. मात्र राज्य मंत्रिमंडळाच्या प्रथम विस्तारात त्यांना स्थान मिळाले नाही. यामुळे त्यांनी आपली नाराजीही व्यक्त केली होती. लवकरच दुसरा मंत्रिमंडळ विस्तार होणार असल्याचे म्हटले जात आहे. यामध्ये शिरसाट यांना संधी मिळणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sanjay shirsat comment on shiv sena rebel mlas and surat guwahati visit prd
First published on: 30-09-2022 at 19:15 IST