दरवर्षी विजयादशमीनिमित्त मुंबईतील शिवाजी पार्कवर शिवसेनेतर्फे दसरा मेळाव्याचे आयोजन केले जाते. या मेळाव्यासाठी राज्यभरातील शिवसैनिक मुंबईत दाखल होतात. मात्र यावर्षी शिवसेना पक्षात उभी फूट पडल्यामुळे शिवाजी पार्कवर कोण मेळावा घेण्यावरून चढाओढ लागली आहे. हा मेळावा शिवाजी पार्कवरच घेण्यासाठी उद्धव ठाकरे समर्थकांकडून प्रयत्न केले जात आहेत. आज शिवसेनेच्या उपविभाग प्रमुखांच्या बैठकीत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दसरा मेळाव्यासाठी मोठ्या संख्येने येण्याचे आवाहन केले आहे. असे असताना शिवसेनेचे नेते सुनील प्रभू यांनीही यावर भाष्य केले आहे. आतापर्यंत आम्हाला या कार्यक्रमाला परवानगी मिळालेली आहे. यावेळीदेखील परवानगी मिळालीच पाहिजे, अशी आमची भूमिका असल्याचे सुनिल प्रभू यांनी सांगितले आहे. ते ‘एबीपी माझा’ या मराठी वृत्तवाहिनीशी बोलत होते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >> शिवेसेनेचा दसरा मेळावा शिवाजी पार्कवरच? उद्धव ठाकरेंनी दिले कार्यकर्त्यांना महत्त्वाचे आदेश

शिवसेनेच्या आजच्या बैठकीत उद्धव ठाकरे यांनी उपविभाग प्रमुखांशी संवाद साधला. शिवसेनेचा दसरा मेळावा हा विचारांची देवाणघेवाण असते. संस्कृतीचे जतन असते. परंपरा म्हणून प्रत्येक शाखेतून शिवसैनिक मोठ्या संख्येने शिवाजी पार्कवर येत असतात. शिवसेनेच्या स्थापनेपासून शिवाजी पार्कवरच दसरा मेळावा होते. तेथे विजयादशमीनिमित्त शस्त्रांचे पूजन केले जाते. संस्कृतीचे जतन केले जाते. विचारांचं सोनं लुटलं जातं. या कार्यक्रमाला आतापर्यंत परवानगी मिळालेली आहे. यावेळीदेखील ही परवानगी मिळालीच पाहिजे, अशी आमची भूमिका आहे, असे सुनिल प्रभू म्हणाले.

हेही वाचा >> विजयादशमीला संघाच्या नागपूर इथल्या शस्त्रपूजन कार्यक्रमाला पाहुण्यांच्या यादीत प्रथमच महिलेला स्थान

पालिकेने कितीही टाळाटाळ केली तरी मागील अनेक वर्षांचा संदर्भ घेतल्यानंतर शिवसेनेलाच ही परवानगी द्यावी लागलेलीआहे. संस्कृतीचे जतन करत असलेले पक्ष तसेच संस्था यांना कायदा व सुव्यवस्था पुरवण्याची जबाबदारी सरकारची आहे. बाळासाहेब ठाकरे यांचे शिवसैनिक मोठ्या संख्येने तसेच शिस्तीने शिवाजी पार्कवर येणार आहेत. शिवसेनेच्या शिष्टमंडळाने मेळाव्यासाठीची परवानगी मिळण्याबाबत पालिका आयुक्तांची भेट घेतली आहे. त्यानंतर याबाबत आम्ही लवकरच निर्णय घेऊ, असे आयुक्तांनी सांगितलेले आहे. यावर्षी असं काय झालं की परवानगी देण्यासाठी दिरंगाई होत आहे? असा सवालही सुनिल प्रभू यांनी केला.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sunil prabhu said shivsena dussehra melawa will be on shivaji park prd